Goa Comunidade: गोव्‍यातील कोमुनिदादीतील अतिक्रमणांना अभय नको!

Goa Comunidade: अधिवेशनात ठराव : सरकारी हस्तक्षेप थांबवा; संहितेत बदल करण्यापूर्वी विश्‍वासात घ्या!
Goa Comunidade
Goa ComunidadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Comunidade: गोव्‍यातील कोमुनिदादींचे वेगळेपण व स्‍वातंत्र्य राज्‍य सरकारने अबाधित राखावे. त्‍यात नाहक हस्‍तक्षेप करू नये. संहितेत कोणतीही सुधारणा करण्‍यापूर्वी कोमुनिदादींच्‍या सदस्‍यांशी सल्‍लामसलत करावी.

Goa Comunidade
Beach In Goa: गोव्यातील सर्वात शांत ठिकाण म्हणून ओळखला जाणारा हा बीच तुम्हाला माहित आहे का?

अतिक्रमण केलेली बांधकामे अधिकृत करू नयेत, असा सूर आजच्या कोमुनिदाद अधिवेशनात व्‍यक्‍त झाला. यावेळी तसे ठरावही मंजूर करण्‍यात आले.

कोमुनिदाद संरचनेत काही बदल होत आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर दोनापावल येथील ‘एनआयओ’च्‍या सभागृहात आज राज्यातील कोमुनिदाद संस्थांचे एकदिवसीय अधिवेशन पार पडले. यावेळी राज्‍यभरातून मोठ्या संख्‍येने कोमुनिदादींचे सदस्‍य दाखल झाले होते.

सध्‍या राज्‍यात 223 कोमुनिदाद कार्यरत आहेत. यावेळी 12 मुद्यांवर सूचना व हरकती मांडण्‍यात आल्‍या. सरकारच्‍या वतीने महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात उपस्‍थित होते. उपस्‍थित सदस्‍यांनी आपले मुद्दे पोटतिडकीने मांडले.

Goa Comunidade
Turmeric Farm In Goa: गोव्यात हळदीचे पीक फायद्याचे की तोट्याचे?

जुन्‍या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्याची मागणी करण्‍यात आली. कृषी जमिनींमध्ये शेतीला प्रोत्‍साहन देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

कोमुनिदादच्या बहुतांश भूभागांवर बेकायदा अतिक्रमणे असल्याचेही काहींनी निदर्शनास आणून दिले. अतिक्रमित बेकायदा घरांची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी कोमुनिदादच्या मुखत्याराला अतिरिक्त अधिकार

यावेळी कोमुनिदादचे सहसचिव सुरेंद्र, महसूल खात्याचे सचिव संदीप जॅकीस, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, तसेच पाच सदस्यांचे मंडळ उदा. ॲड. सावियो कुरैय्या, एस्पिटारो डेमेलो, नेल्सन फर्नांडिस, मार्विन गोन्साल्विस आणि अविनाश तावारीस तसेच या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित तुलिओ डिसोझा उपस्थित होते.

या अधिवेशनानंतर महसूल खात्याचे सचिव संदीप जॅकीस म्हणाले की, या अधिवेशनात घेतलेले ठराव राज्य सरकारकडे अभ्यासासाठी पाठवण्यात येणार आहेत. सरकार या ठरावांचा आढावा घेईल आणि लोकांच्या सूचनांचा विचार करेल.

‘तुमची जागा स्वयंपाकघरातच’; महिलांना हक्क देण्यावरून तणाव

यावेळी महिलांना कोमुनिदाद प्रशासकीय संरचनेत समान हक्‍क द्यावा, अशी मागणी काहीजणांनी केली. मात्र, या मुद्यावर काही सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ‘तुमची जागा स्‍वयंपाकघरात आणि तुमचे काम मुले-बाळे सांभाळणे इतकेच आहे. संहितेत महिलांचा सहभाग नव्‍हता. मग आताच का’, असा प्रश्‍‍न वेर्ला कोमुनिदादीच्या एका पुरुष सदस्‍याने उपस्‍थित केला. त्‍यावरून वातावरण तंग झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com