Vasco: वास्कोतील भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्याची जोरदार मागणी

Scrap Dump: भरवस्तीत असल्याने चर्चेत- वेल्डिंगचा वापर; दुर्घटनेची शक्यता
Scrap Dump
Scrap DumpDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco: कोलवाळ येथे चार भंगारअड्डयांना लागलेल्या आगीमुळे येथील भरवस्तीतील भंगार अड्डेही चर्चेत आले. त्यामुळे वास्कोतील भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्यात यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

राज्यात असणारे भंगार अड्डे किती वैध व किती अवैध आहेत याची कोणतीही माहिती कोठेही उपलब्ध नाही. यापूर्वी बायणा भागात भंगार अड्डे पाहण्यास मिळत होते; परंतु आता मांगोरहिल, शहर भागात, शांतीनगर तसेच इतर ठिकाणी भंगार अड्डे उदयास आले आहेत. यापैकी बहुतांश भंगार अड्डे हे वस्तीमध्येच आहेत.

भंगार अड्ड्यांमध्ये येणाऱ्या भंगार वस्तू कापण्यासाठी काहीवेळा वेल्डिंगचा वापर करण्यात येतो. त्यावेळी कोणती खबरदारी घेण्यात येते याची माहिती नाही. बायणातील एक अड्डेवाल्याने तर भंगारात आलेली वाहने अड्डयासमोर व रस्त्याकडेला ठेवतो. त्याचे निरनिराळे भाग वेगळे करण्यासाठी तेथेच वेल्डिंगचा वापर करण्यात येतो.

Scrap Dump
Madgaon: पठ्ठ्याने कोल्हापुरहून थेट गोवा गाठलं; चोरीसाठी लढवली अजब शक्कल

वास्को येथे भरवस्तीमध्ये असलेले हे भंगार अड्डे धोकादायक आहेत. याप्रकरणी मुरगाव पालिका व इतर संबंधित सरकारी यंत्रणेने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. हे भंगार अड्डे शहराबाहेर हलविण्याची गरज आहे. जेणेकरून ते आपला व्यवसायही करू शकतील व नागरिकांच्या जीवाला धोका उद्‍भवणार नाही. - शंकर पोळजी, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com