Mid Day Meal: शाळांमध्ये माध्यान्ह भोजन देणाऱ्या बचत गटांची थकबाकी लवकर द्यावी; गोवा फॉरवर्डची मागणी

अनेक विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट खरेदी करण्यासाठी निधी मिळालेला नाही, असेही गोवा फॉरवर्ड पार्टीतर्फे सांगण्यात आले आहे.
Mid Day Meal
Mid Day MealFile Photo
Published on
Updated on

Mid Day Meal: गोव्यातील शाळांमध्ये माध्यान्ह देणाऱ्या बचत गटाच्या बिलावरून राज्यात याआधीही मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. याचबाबत गोवा फॉरवर्ड पार्टीने काल (सोमवार) शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची भेट घेतली आणि त्यांना सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजन देणाऱ्या बचत गटांची थकबाकी भरण्याची विनंती केली. अनेक विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट खरेदी करण्यासाठी निधी मिळालेला नाही, असेही गोवा फॉरवर्ड पार्टीतर्फे सांगण्यात आले आहे.

Mid Day Meal
Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: साखळीत रश्‍मी, तर फोंड्यात रितेश शक्य; शर्यत नगराध्यक्षपदाची

गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई गोवा विधानसभेच्या जुलैच्या अधिवेशनात हे मुद्दे उपस्थित करणार आहेत.

लोलयेकर म्हणाले की, आम्ही याबाबत निवेदन सादर केले आहे आणि विद्यार्थ्यांना रेनकोट, गणवेश प्राधान्याने दिले जावेत अशी मागणी केली आहे. या गोष्टीसोबतच पॅरा शिक्षक आणि कंत्राटी शिक्षकांचे पगार वेळेवर देण्यात यावेत असेही आम्ही सांगितले असून यावर आमचा पक्ष लक्ष ठेवेल, असे सांगितले आहे.

ते म्हणाले की, मुलांना माध्यान्ह भोजन, रेनकोट आणि गणवेश प्रदान करण्यात अपयशी झाल्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण होतील, विशेषत: पावसाळ्यात, त्यांना नियमितपणे शाळेत जाताना त्रास होऊ शकतो.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यार्थ्यांना गणवेश आणि रेनकोट खरेदी करून देण्याऐवजी पालकांना निधी हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com