Demand For Drinks Summer Increases: उष्णतेचा पारा वाढल्याने शीतपेयांना चांगले दिवस आले आहेत. शीतपेयांना मागणीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
गरमीपासून सुटका मिळविण्यासाठी प्रत्येकाला थंड आणि शीतल गारवा हवाहवासा वाटतोय. त्यामुळे प्रत्येकाची पावले शीतपेयांचे गाडे, दुकानांसह आइस्क्रीम पार्लरच्या दिशेने वळत आहेत. डिचोली शहरासह विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून असेच चित्र दिसून येत आहे.
बदलत्या हवामानामुळे गेल्या दोन दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झालेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उकाडा असह्य झाला आहे.
अंगाची लाही-लाही होत असून, घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. साहजिकच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत गेल्या दोन दिवसांत शीतपेयांची दुकाने आणि आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी उसळत आहे.
बहुतेकजण लिंबूसोडा, लस्सी, शहाळ्याचे पाणी याला अधिक पसंती देत आहेत. गेल्या महिन्याहून अधिक काळापासून उष्णतेच्या पाऱ्यामध्ये चढउतार होत आहे.
गेल्या जवळपास महिन्यापासून आपल्या गाड्यावर ग्राहकांची गर्दी होत आहे, असे मये तलावावरील एक लिंबू-सोडा विक्रेता ज्ञानेश्वर सरमळकर यांनी सांगितले.
दरम्यान, उकाड्यावर मात करण्यासाठी शीतपेय आणि थंड पदार्थांची मागणी प्रचंड वाढली आहे. तरीही शीतपेय किंवा आइस्क्रीम खाताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे जाणकारांचे मत आहे.
लिंबू-सोडा, शहाळ्यांचा भाव वाढला
उष्णतेमुळे मागणी असल्याने शीतपेयांचा भावही यंदा वाढला आहे. 25 ते 30 रुपये ग्लास याप्रमाणे दर लिंबू-सोडाचे दर आहेत. शहाळी 40 ते 50 रुपये या दराने विकण्यात येत आहेत.
लस्सी, ज्यूस, शेक, आइस्क्रीम यांचेही दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. तरी देखील उकाडा असह्य झाला की शीतपेयांची दुकाने फुल्ल होत आहेत. रस्त्यालगताच्या गाड्यांसमोरही गर्दी दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.