Dudhsagar Falls: जगातील पर्यटनस्थळांप्रमाणेच दूधसागरवर सोयीसुविधा उभारा; दिव्यांगांची मोठी मागणी!

Dudhsagar Falls: गोवा सरकारने ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे पर्यटन व्यवसायात भरारी येणार आहे.
Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDainik Gomantak

Dudhsagar Falls: दूधसागर धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्यात दिव्यांगांचाही समावेश असतो. जगातील अनेक पर्यटनस्थळांवर दिव्यांगांसाठी चांगल्या प्रकारची सोय केली जाते; पण दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या दिव्यांगांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी सोयीसुविधांची उभारणी करण्याची मागणी होत आहे.

आमदार डॉ. गणेश गावकर यांनी आमच्यासारख्या अपंगत्व असलेल्या लोकांना दूधसागर धबधबा पाहण्यासाठी सोय करावी, अशी मागणी दिव्यांगांकडून होत आहे. गोव्यातील प्रसिद्ध असलेले कुळे-दूधसागर पर्यटनस्थळ स्थानिकांसाठी वरदान ठरत आहे.

Dudhsagar Falls
Comunidades of Goa: कोमुनिदाद समितीमध्ये संभ्रम! इमारत सरकारला कायमस्वरुपी पाहिजे की; केवळ दुरुस्तीपुरती?

1998 पासून या दूधसागर पर्यटन व्यवसाय असोसिएशनची सुरुवात करण्यात आली सध्या या व्यवसायात 333 आणि पूर्वीच्या 98 मिळून एकूण 431 जीपगाड्या पर्यटकांना ने-आण करण्यासाठी कार्यरत आहेत. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह चालवत आहेत, त्यामुळे हा व्यवसाय स्थानिक नागरिकांना वरदान ठरलेला आहे.

समितीने दखल घ्यावी

दूधसागरवर भिकारी भीक मागतात. तसेच एक अपंग व्यक्ती येणा-जाणाऱ्यांकडून पैसे मागतो. अशाप्रकारे भीक मागणाऱ्यांमुळे दूधसागरचे चुकीचे दर्शन सोशल मीडियावर येण्यास उशीर लागणार नाही तेव्हा संबंधित समितीने याची दखल घ्यावी.

जोजफ बार्रेटो-

सरकारने ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे पर्यटन व्यवसायात भरारी येणार आहे. ऑनलाईनमुळे पर्यटकांत उत्साह निर्माण झाला आहे. जीपची संख्या वाढवावी तसेच या हंगामाची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 4 वा.पर्यंत केल्यास व तासाला 60 गाड्या सोडल्यास पर्यटकही धबधबा पाहण्यासाठी जाणार असल्याने यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना त्याचा फायदा होईल, तेव्हा सरकारने याचा विचार करावा.

अशोक खांडेपारकर, अध्यक्ष-

दूधसागर धबधबा येथील पर्यटनस्थळ व्यवस्थित चालावे यासाठी सरकारने ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया चालू केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन महामंडळाचे चेअरमन डॉ. गणेश गावकर व वनमंत्री विश्वजीत राणे यांनी 35 गाड्या दरदिवशी वाढविल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. दरदिवशी एकूण 275 गाड्या पर्यटकांना घेऊन जातात. सुट्टी असल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com