Delhi to Goa flight faces technical issue and is diverted to Mumbai
Technical snag forces Delhi Goa flight to land in MumbaiDainik Gomantak

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

Delhi Goa Flight Diverted to Mumbai: विमानाची आवश्यक ती तांत्रिक तपासणी व देखभाल - दुरुस्ती केल्यानंतरच विमानाचे उड्डाण होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
Published on

मुंबई: तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीतून गोव्याकडे येणारे विमान मुंबईला वळविण्यात आले. इंडिगो कंपनीचे 6E 6271 विमान दिल्लीतून गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असताना ही घटना घडली. तांत्रिक बिघाडानंतर विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले.

इंडिगो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे ६ई ६२७१ विमानाने दिल्लीतून गोव्यासाठी उड्डाण घेतले. हे विमान गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान तात्काळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले.

Delhi to Goa flight faces technical issue and is diverted to Mumbai
पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

विमानाची आवश्यक ती तांत्रिक तपासणी व देखभाल - दुरुस्ती केल्यानंतरच विमानाचे उड्डाण होईल. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, लवकरच हे विमान प्रवाशांना घेऊन उड्डाण घेईल, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com