45 कोटींची लाच! गोव्यातील आपच्या प्रत्येक उमेदवाराला 90 लाख देण्याचा केजरीवालांनी केला होता वादा; CBI

Delhi Liquor Scam: सर्व पैसा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या मर्जीने खर्च करण्यात आला.
45 कोटींची लाच; गोव्यातील आपच्या प्रत्येक  उमेदवाराला 90 लाख देण्याचा केजरीवालांनी केला होता वादा
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Liquor Scam

पणजी: दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरणामुळे अडचणीत आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अटकेत आहेत. दिल्ली सरकारच्या या धोरणाबाबत तपासातून दररोज नवनवे खुलासे समोर येतायेत.

या घोटाळ्यातून मिळालेला पैसा केजरीवालांच्या मर्जीने खर्च करण्यात आला अशी माहिती आता सीबीआयने कोर्टात दिलीय. तसेच, केजरीवालांनी गोव्यातील आपच्या प्रत्येक उमेदवाराला ९० लाख रुपये देण्याचा वादा देखील केला होता, अशी माहिती सीबीआयने कोर्टाला दिली.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळ्यातून मिळालेला सर्व पैसा आम आदमी पक्षाच्या फंडात जमा करण्यात आला. सर्व पैसा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या मर्जीने खर्च करण्यात आला.

केजरीवालांनी राज्यातील आपच्या प्रत्येक उमेदवाराला ९० लाख रुपये देण्याचा वादा केला होता. गोव्यात विधानसभेचे ४० उमेदवार आहेत, अशी माहिती सीबीआयने कोर्टाला दिली.

साऊथ ग्रुपसोबत मोलभाव करण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते विजय नायर यांची मुख्यमंत्री केजरीवाल यांनी निवड केल्याचेही सीबीआयने म्हटले आहे.

45 कोटींची लाच; गोव्यातील आपच्या प्रत्येक  उमेदवाराला 90 लाख देण्याचा केजरीवालांनी केला होता वादा
IIT प्रकल्पामुळे गोव्याच्या तिजोरीवर पडणार 60 कोटींचा बोजा, भूसंपादन प्रक्रियेत वरिष्ठ मंत्र्यांचा स्वार्थ; काँग्रेस

दारू परवान्याच्या बदल्यात आम आदमी पक्षाला 100 कोटी किकबॅक दिल्याचा आरोप असलेल्या गटाला व्यावसायिकांचे कार्टेल म्हणून संबोधले जाते. या गटात भारत राष्ट्र समितीचे नेते के कविता, अरुण पिल्लई, राघव मागुंटा, अरुण पिल्लई, बुच्चीबाबू गोरंटला, पी सरथ रेड्डी, अभिषेक बोईनपल्ली आणि बेनॉय बाबू यांचा समावेश आहे.

आपने राजिंदर नगरचे आमदार दुर्गेश पाठक यांची गोवा निवडणुकीसाठी पक्ष प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. किकबॅकद्वारे मिळालेले सर्व पैसे त्याच्या सूचनांवर खर्च करण्यात आले, असा दावा सीबीआयने केला आहे. निवडणूक खर्चाचे सर्व व्यवहार रोखीने करण्यात आल्याचा आरोपही सीबीआयने केलाय.

दरम्यान, साऊथ ग्रुपकडून मिळालेली 45 कोटी रुपयांची लाच गोव्यातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरली गेली होती, असा दावा सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com