गोवा टॅक्सी चालकांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा

केजरीवालांचे गोव्यातील ऑटो/टॅक्सी चालकांसाठी आणखी चार आश्वासन
Delhi CM  Arvind Kejriwal 4 guarantees for Auto and Taxi drivers in Goa
Delhi CM Arvind Kejriwal 4 guarantees for Auto and Taxi drivers in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल काल पासून गोवा दौऱ्यावर आहेत. त्याच्या उपस्थितीत काल भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वजीत कृष्णराव राणे यांनी मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि आज केजरीवाल यांनी दोबोळी येथिल सभेत बोलतांना गोवेकरांना आणखी नवे आशअवासन दिले. गोव्यातील ऑटो/टॅक्सी चालकांसाठी आज आणखी चार आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात दिले.

ऑटो/टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापना करणार. चालकाचा अपघात झाल्यास वैद्यकीय खर्च सरकार उचलणार, फेसलेस आरटीओ सेवा आणि सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याची ग्वाही त्यांनी दाबोली येथे दिली आहे. कालपासून केजरीवाल गोवा दौऱ्यावर आहेत.

गोवा टॅक्सी चालकांसाठी आपची घोषणा

1) ऑटो/टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापन केले जाईल

2) चालकाचा अपघात झाल्यास वैद्यकीय खर्च शासन उचलेल

3) फेसलेस RTO सेवा

4) SC मध्ये AAP मीटरबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देईल

'आप'ने यापुर्वी गोव्यात केलेल्या घोषणा

1) अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीयांवर ‘भावनिक’ गुगली टाकली. राज्यात सरकार आल्यास हिंदूंना शिर्डी-अयोध्या, ख्रिश्‍चनांना वालंकिणी आणि मुस्लिमांना अजमेर शरिफच्या सहलीची ऑफर त्यांनी दिली.

2) 300 युनिटपर्यंत वीज मोफत. शेतकऱ्यांना पंपासाठी वीज माफ.

3) राज्यातील प्रत्येक घरात एका व्यक्तीला नोकरी, नोकरी मिळेपर्यंत 3000 रोजगार भत्ता, खाण अवलंबितांना कुटुंबाला 5000 रुपये.

4) धार्मिक स्थळांच्या पर्यटनाची मोफत संधी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com