Premier League Cricket: ‘एमसीसी’च्या विजयाने गतविजेता जीनो ‘आऊट’

धेंपो क्लब, पणजी जिमखान्याची उपांत्य फेरी निश्चित
Premier League Cricket | Darshan Misal
Premier League Cricket | Darshan Misal Dainik Gomantak
Published on
Updated on

Premier League Cricket: एमसीसी संघाने 140 धावांनी दणदणीत विजय नोंदवत जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील गतविजेत्या जीनो क्लबचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आणले. या निकालामुळे पणजी जिमखान्याचीही ब गटातून उपांत्य फेरीत पक्की झाली.

अ गटात साळगावकर व धेंपो क्लब यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. आघाडीच्या तीन गुणांमुळे साळगावकर संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहिला. धेंपो क्लबचे दोन लढतीतून सात गुण झाले. त्यामुळे त्यांची या गटातून उपांत्य फेरी निश्चित झाली.

अजून गुणखाते न खोललेल्या चौगुले क्लबना अखेरच्या लढतीत साळगावकर क्लबला हरवावेच लागेल, साळगावकर संघाला अनिर्णित निकालही पुरेसा असेल. ब गटात एमसीसीचे सहा, पणजी जिमखान्याचे तीन गुण झाले.

या दोन्ही संघांतील शेवटचा साखळी सामना गतविजेता ठरवेल. दोन्ही सामने खेळलेल्या जीनो क्लबच्या खाती फक्त एकच गुण जमा झाला.

Premier League Cricket | Darshan Misal
IND vs AUS: ऑस्ट्रेलियालाने दिले 15 वर्षे जुन्या रेकॉर्ड्सला आव्हान, 2008 मध्ये टीम इंडिया...

दर्शनच्या सामन्यात दहा विकेट

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर एमसीसीने एकूण २३७ धावांची आघाडी घेतल्यानंतर जीनो क्लबचा दुसरा डाव अवघ्या ९७ धावांत संपुष्टात आला. एमसीसीचा कर्णधार डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ (5-52) व ऑफस्पिनर वेदांत नाईक (4-22) यांच्या भेदकतेसमोर 1 बाद 53 वरून जीनो क्लबने नऊ विकेट अवघ्या 44 धावांत गमावल्या.

पहिल्या डावातही निम्मा संघ गारद केलेल्या दर्शनने सामन्यात 109 धावांत 10 गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. जीनोतर्फे आनंद तेंडुलकर (32), सनथ नेवगी (20) व योगेश कवठणकर (15) यांनीच दुहेरी धावसंख्या गाठली.

एमसीसीचा पहिला डाव अवघ्या 86 धावांत आटोपला होता, मात्र दुसऱ्या डावात त्यांनी 313 धावा करून स्थिती बळकट केली. पहिल्या डावात 162 धावा करून 76 धावांच्या आघाडीनंतरही जीनो क्लबला पराभूत व्हावे लागले.

Premier League Cricket | Darshan Misal
WTC Final मध्ये पोहोचण्याची टीम इंडियाला मोठी संधी, 'कॅप्टन'ने केली भविष्यवाणी!

दिशांक, आयुषची फलंदाजीत चमक

सांगे येथील जीसीए मैदानावर साळगावकर क्लबच्या 295 धावांना उत्तर देताना धेंपो क्लबचा पहिला डाव 241 धावांत आटोपला होता. 54 धावांच्या आघाडीनंतर काल 3 बाद 15 अशी स्थिती असलेल्या साळगावकर क्लबने शुक्रवारी 6 बाद 80 वरून दुसरा डाव 7 बाद 185 धावांवर घोषित केला.

अनिर्णित राहिलेल्या या सामन्यात साळगावकरचे युवा खेळाडू दिशांक मिस्कीन (51) व आयुष वेर्लेकर (नाबाद 64) यांची फलंदाजी चमकदार ठरली. याशिवाय यश कसवणकर यानेही 28 धावा केल्या. धेंपो क्लबतर्फे फरदीन खानने 54 धावांत 3, तर लक्षय गर्गने 9 धावांत 2 गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com