समाज माध्यमांवरुन दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवार पल्लवी धेंपे आणि भाजपच्या एसटी माेर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोझा या दोघांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला संशयित सूरज नाईक पवार याला आज मायणा-कुडतरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली.
नाईक पवार याला पाेलीस स्थानकावर चौकशीसाठी बोलावले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पोलिसांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला फौजदारी आचारसंहितेच्या 151 कलमाखाली प्रतिबंधात्मक अटक केल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.
सूरज नाईक पवार याने व्हॉटस्अॅपवरुन अनेक ग्रूपवर पल्लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांचे फोटो असलेल्या पाकिटांचे छायाचित्र अपलोड करुन अशाप्रकारची शेकडो पाकिटे राय येथे सापडली अशा आशयाचा पोस्ट टाकला होता.
त्यामुळे अँथनी बार्बोझा यांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर पल्लवी धेंपे यांचे निवडणूक एजंट दीपक नाईक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार नोंदविली होती.
अशी पाकिटे पल्लवी धेंपे, अँथनी बार्बोझा किंवा भाजपाच्या कुठल्याही पदाधिकार्याने छापली नव्हती असा दावा करुन हा पोस्ट व्हायरल करुन नाईक पवार याने भाजप उमेदवाराची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.