Deen Dayal Swasthya Seva Yojana : दीनदयाळ स्वास्थ्य कार्ड नूतनीकरण म्हणजे मनस्ताप; लुबाडणुकीचा प्रकार

प्रवीण वायंगणकर : प्रत्येक पंचायतीत सुविधा द्या
Deen Dayal Swasthya Seva Yojana
Deen Dayal Swasthya Seva Yojana Dainik Gomantak

हरमल : दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेच्या कार्डची नूतनीकरण प्रक्रिया म्हणजे लोकांची लुबाडणूक, सतावणूक व हेलपाटे घालण्याचे कारस्थान आहे. लोकांचा त्रास टाळण्यासाठी आरोग्य खात्याने प्रत्येक पंचायत क्षेत्रात नूतनीकरण सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी माजी पंच सदस्य प्रवीण वायगंणकर यांनी केली आहे.

दरम्यान, काल(10 रोजी) लोकांना नूतनीकरण करण्याचे मोबाईल मेसेज पाठवले,परंतु (11 रोजी) सर्व्हर डाऊन झाल्याने लोकांना माघारी जावे लागले.नूतनीकरण होणार नाही,सर्व्हर डाऊन आहे,अशी पूर्वसूचना लोकांना देण्याचे सौजन्य न दाखवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पेडणे तालुक्यातील तुयेतील सध्या कार्यान्वित असलेली जागा खूपच अपुरी व कसल्याच सुविधा नसलेली इमारत असून, लोकांना श्वास घेण्यासही अडथळा होत आहे. तसेच पंख्याची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची बरीच आबाळ झाल्याचे वायगंणकर यांनी सांगितले. सध्या उन्हाळा सुरू झाला असून,किमान पंख्याची सुविधा असणे आवश्यक असते, मात्र, पंखा नसलेल्या खोलीत नूतनीकरण ठेवल्याने खात्याच्या भोंगळ व मनमानी कारभाराचा अनुभव लोकांनी का घ्यावा, असा सवाल वायगंणकर यांनी केला.

Deen Dayal Swasthya Seva Yojana
Beny Dayal Hit by Drone : गायक 'बेनी दयाल'ला कॉन्सर्टमध्ये ड्रोनची धडक, डोक्याला मार

ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास

तुये येथे दीनदयाळ स्वास्थ्यसेवा कार्ड नूतनीकरणासाठी असलेल्या इमारतीत ज्येष्ठ नागरिकांची अतिशय गैरसोय होत आहे, असे वायंगणकर यांनी सांगितले. कार्ड नूतनीकरण करण्याच्या खोलीत किमान पंख्याची सोय असायला हवी होती. मात्र, सरकारने पंख्याचीही सोय केलेली नाही. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेल्यांना नाहक त्रास होत आहे. महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना फार त्रास सोसावा लागत आहे, मात्र संबंधितांकडून या त्रासाकडे दुर्लक्ष केले जात आहे,असेही वायंगणकर म्हणाले.

Deen Dayal Swasthya Seva Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात? 'ही' एक चूक पडू शकते महागात

दीनदयाळ कार्डचे नूतनीकरण असल्याने मोरजीहून 8 वाजता बसमधून तुयेला आले, मात्र सर्व्हर डाऊन झाल्याचे 11 वाजता समजले व आता घरी जायला बस पुन्हा 2 वाजता असल्याचे समजले. त्यामुळे फार त्रास सोसावा लागला.लोकांना नूतनीकरण करण्यासाठी बोलावले जाते,मात्र पुन्हा लोकांना कळवण्याचे भान कंत्राटदार कंपनीचे अधिकाऱ्यांना नसते.

- द्रौपदी, गृहिणी (मोरजी)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com