गोव्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय एप्रिलच्या सुरुवातीला

मुख्यमंत्र्यांची माहिती: खाते वाटपाचीही प्रतीक्षा
CM Pramod Sawant Latest News, Goa Cabinet Expansion News
CM Pramod Sawant Latest News, Goa Cabinet Expansion NewsDainik Gomantak

पणजी: खाते वाटप आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी प्रतीक्षा करावी लागणार असून हे दोन्ही निर्णय एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली. बहुमत मिळाल्यानंतर भाजपने अपक्ष आणि मगो पक्षाच्या साहाय्याने सरकार बनवले. अपक्ष आणि मगोपच्या प्रत्येकी एका आमदाराला मंत्रिमंडळात घेण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती होती. मात्र, सोमवारच्या शपथविधी सोहळ्यात केवळ भाजपच्याच आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान,आज झालेल्या सोहळ्यामध्ये मगोपकडून सुदिन ढवळीकर आणि अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांना मंत्रिपद निश्चित झाल्याची माहिती होती. मात्र, या दोघांनाही आज वगळण्यात आल्याने सर्वांना धक्का बसला आहे. दुसरीकडे सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद देण्यावरून भाजपचे आमदार आणि कार्यकर्त्यांचा मोठा विरोध आहे. (Goa Cabinet Expansion News Updates)

CM Pramod Sawant Latest News, Goa Cabinet Expansion News
गोव्यात शत प्रतिशत भाजप मंत्रिमंडळ

अगोदरच फोंडा तालुक्यामधील रवी नाईक, सुभाष शिरोडकर आणि गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आल्याने नव्याने या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळणे अवघड बनल्याने हा निर्णय मागे ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या ऐवजी आता पेडण्याचे आमदार जीत आरोलकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच खाते वाटप होईल अशी शक्यता होती. मात्र त्यासाठीही आता मंत्र्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे.

CM Pramod Sawant Latest News, Goa Cabinet Expansion News
धडे सावर्डे खून प्रकरण : दत्तक मुलाकडूनच आईचा खून झाल्याचे उघड

तीन मंत्रिपदे रिक्त; निर्णय लांबणीवर

नव्या कायद्यानुसार मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह केवळ बारा जणांनाच मंत्री म्हणून घेता येते. त्यामुळे आणखीन तीन मंत्रिपदे रिक्त आहेत. यावरून विविध चर्चा सुरू असल्या तरी तिन्ही जागांच्या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाही. याशिवाय काही निर्णय केंद्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे विस्ताराचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com