Campal Lake Fish Death: मळ्यानंतर कांपालमधील तलावात माशांचा मृत्यू! एका महिन्याच्या अंतराने दुसरी घटना; सांडपाण्याचा विषय चव्हाट्यावर

Campal Lake View Colony Dead Fish: पणजीतील आणखी एका म्हणजे कांपाल येथील ‘लेक व्ह्यू कॉलनी’मधील तलावातील मासे मेल्याची घटना समोर आली आहे.
Campal Lake View Colony Dead Fish
Campal Lake Water PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मळा येथील तलावात गेल्या महिन्यात मृत मासे सापडल्याच्या घटनेला महिनाही होत नाही, तोच पणजीतील आणखी एका म्हणजे कांपाल येथील ‘लेक व्ह्यू कॉलनी’मधील तलावातील मासे मेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

मंगळवारी सकाळी या तलावात अनेक मृत मासे तरंगताना आढळल्याने स्थानिकांनी ही बाब महापालिकेला कळविली. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने आणि पणजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. यावेळी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असताना, कामगार तलावातून मृत मासे काढत होते. मळा तलावातील मृत माशांचे प्रकरण मे महिन्यात १० रोजी समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेला या प्रकरणाचा स्वतंत्र अहवाल द्यावा लागला होता. त्यानंतर मळा तलावातील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने माशांचा (Fish) मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

Campal Lake View Colony Dead Fish
Goa News: गोव्यासाठी आनंदाची बातमी! राज्याला ‘स्मार्ट गव्हर्नन्स’ सुवर्ण पुरस्कार; दिल्ल्लीत मंत्री गुदिन्होंनी स्वीकारला सन्मान

मळा तलावातील प्रकार पाण्यातील ऑक्सिजनच्या अभावामुळे झाल्याचे जे कारण पुढे आले, तेच कारण कांपाल येथील तलावाबाबत असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. शहरातील जलस्रोतांमध्ये मासे मरण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांबद्दल रहिवाशांनी चिंता व्यक्त केली असून, यामागील कारणांची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रदूषण, सांडपाण्याचा प्रवाह, पाण्यातील कमी झालेली ऑक्सिजनची कमी पातळी किंवा इतर पर्यावरणीय घटक यासाठी जबाबदार आहेत का, हे निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाण्याची गुणवत्ता तपासणी करावी, असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.

Campal Lake View Colony Dead Fish
Goa News: दारू पिऊन चालवली बस, घातली ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर! म्हापशातील घटनेने खळबळ; बसचालकावर दंडाची कारवाई

प्रदूषण कशामुळे होते, याची तपासणी करा!

मळा तलावातील घटनेमुळे बरीच खळबळ उडाली होती. या तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचे समोर आल्याने महापालिकेचे डोळे उघडले होते. त्यामुळे सुमारे ३१ घरांतील सांडपाणी तलावात जाण्याचे बंद करावे लागले होते. आताही लेक व्ह्यू तलावात सांडपाणी येत असल्यास आजूबाजूच्या सांडपाण्याची तपासणी करावी लागणार आहे. या घटनेविरोधात कोणी सामाजिक संस्था न्यायालयात गेल्यास महापालिकेला याप्रकरणी तोंड द्यावे लागेल, असेही येथील एका नागरिकाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com