आमोणे पुलावरून उडी मारलेल्या व्यक्तीचा अखेर मृतदेह सापडला...

हा मृतदेह तळावली येथील संतोष सावंत यांचा असून, त्यांनी आमोणे पुलावरून नदीत उडी मारली होती.
Dead body found of the person who jumped from Amona bridge
Dead body found of the person who jumped from Amona bridgeDainik Gomantak

आमोणे पुलावरून उडी मारलेल्या व्यक्तीचा अखेर मृतदेह आढळून आला आहे. आज (रविवारी) सकाळी आमोणे येथे मांडवी नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह तळावली येथील संतोष सावंत यांचा असून, त्यांनी आमोणे पुलावरून नदीत उडी मारली होती. (Dead body found of the person who jumped from Amona bridge)

Dead body found of the person who jumped from Amona bridge
Mahadayi Water Dispute: राज्यात महाआरती, घेराव, बंदची हाक

काल शनिवारपासून त्यांचा शोध सुरू होता. डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधिकारी भारत गावस यांच्या नेतृत्वाखाली गीतेश नाईक या जवानाने मृतदेह नदीबाहेर काढला.

यासाठी विशांत वायंगणकर, गौरीश गावस आणि अनुप नाईक या जवानांनी मदतकार्य केले. डिचोली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com