Davorlim Panchayat: दवर्ली सरपंच, उपसरपंचांची निवड लांबणीवर; पंचसदस्यांत वादविवाद, गोंधळानंतर प्रक्रिया ढकलली पुढे

Davorlim: दवर्ली रुमडामळचे सरपंच व उपसरपंच निवडीसाठी आज निवडणूक निश्चित करण्यात आली होती.
Davorlim Panchayat
Davorlim PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दवर्ली रुमडामळचे सरपंच व उपसरपंच निवडीसाठी आज निवडणूक निश्चित करण्यात आली होती. मात्र, कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय गट विकास अधिकाऱ्याने घेतला. मात्र तत्पूर्वी निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून पंच सदस्यांत गोंधळ झाला व काही पंच सदस्यांमध्ये गरमा गरम वादविवाद झाले.

निवडणूक निश्चित असल्याने निर्वाचन अधिकारी अनुराधा सारंग हिने प्रक्रिया सुरु केली होती, भाजप गटाकडून सरपंच पदासाठी विद्याधर आर्लेकर व उपसरपंचपदासाठी संपदा नाईक यांनी तर विरोधी गटाकडून फ्रांसिस्को डायस व मिनीन कुलासो यांनी अर्ज सादर केले होते. अर्ज मागे घेण्याची वेळ सुद्धा टळली होती. इतक्यात गट विकास अधिकाऱ्याने येऊन सरकारने सुट्टी जाहीर केल्याने आजची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला.

Davorlim Panchayat
Goa Former CM Ravi Naik Dies : माजी मुख्यमंत्र्यांना अखेरची मानवंदना! गोव्यात तीन दिवसांचा दुखवटा, एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

या बैठकीचा इतिवृत्तांतही लिहिला होता व त्यावर सर्वांनी सह्याही केल्या होत्या. मात्र लगेच अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिल्याने गोंधळ निर्माण झाला. पण नंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे चर्चा करून ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय अंतिम असल्याचे जाहीर केले. व निवडणुकीची तारीख नंतर जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले.

पंच श्याम उर्फ साईश राजाध्यक्ष तसेच नावेली भाजप मंडळाचे अध्यक्ष विजय सुरमे यांनी सांगितले की या निवडणुकीत आमदाराचा मुळीच हस्तक्षेप नाही. त्यांनी गट विकास अधिकारी किंवा निर्वाचन अधिकाऱ्यांवरही कसलाही दबाव घातलेला नाही.

केवळ सरकारने सुट्टी जाहीर केल्यानेच निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी निर्वाचन अधिकारी अनुराधा सारंग यांनी सरकारचा सुट्टीचा आदेश वाचून दाखवला व निवडणूक पुढे ढकलल्याचे जाहीर केले.

आम्हाला गृहित धरू नका!

पंच सदस्य मिनिनो कुलासो यानी सांगितले की आम्हा एसटी समाजाच्या लोकांना गृहीत धरू नका. एकदा रद्द केलेली निवडणूक प्रक्रिया परत सुरू करण्याचे कारण काय. हा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून घेतला गेला, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

Davorlim Panchayat
Goa Crime: 'ड्रग्ज'प्रकरणी नायजेरियन व्यक्तीला अटक, 64 ग्रॅम गांजासह स्कूटर जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

या निवडणुकीत आमदाराचा हस्तक्षेप होत आहे. त्यांच्या गटाचे सरपंच व उपसरपंच निवडून येणार नाहीत, असे दिसल्याने ही निवडणूक रद्द करुन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला. - प्रतिमा कुतिन्हो, सामाजिक कार्यकर्त्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com