Davorlim Panchayat: ''भाजपचं गलिच्छ राजकारण चाललंय'', शेवटच्या क्षणी पंचायत निवडणूक रद्द! दवर्ली पंचायतीत हाय व्होल्टेज ड्रामा

Davorlim Panchayat election: पंचायत संचालकांनी निवडणुकीच्या अगदी शेवटच्या क्षणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सदस्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाले
Panchayat election Goa
Panchayat election GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Davorlim Panchayat election cancelled: गोव्यातील दवर्ली पंचायत येथे मंगळवारी (दि.१५ ऑक्टोबर) रोजी सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. पंचायत संचालकांनी निवडणुकीच्या अगदी शेवटच्या क्षणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सदस्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाले. या अचानक आलेल्या निर्णयामुळे पंचायतीचे वातावरण चांगलेच तापले. मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या सार्वजनिक सुट्टीनंतर दवर्ली पंचायत सरपंच निवडणूक रद्द करण्यात आली.

या निवडणुकीसाठी चार अर्ज दाखल झाले होते, मात्र बीडीओने अनपेक्षितपणे पुन्हा उमेदवारांना निवडणुकीसाठी बोलावल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर गोंधळ उडाला, काही पंचायत सदस्यांनी स्थानिक आमदारांचा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पाडण्यात सहभाग असल्याचा आरोप केला.

Panchayat election Goa
Rumdamol Davorlim: रुमडामळ-दवर्ली पंचायतीच्या 4 पंच सदस्यांना ठरवले अपात्र

निवडणूक रद्द करण्याचा आदेश आल्यानंतरही, तेथे उपस्थित असलेले पीठासीन अधिकारी मात्र निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास आग्रही असल्याचे वृत्त आहे. यामुळे पंचायतीतील सदस्यांमध्ये गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण आणखी वाढले. सदस्यांनी या अचानक रद्द करण्याच्या निर्णयावर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व देण्याची मागणी केली.

भाजपवर 'गलिच्छ राजकारणा'चा आरोप

या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. गोव्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्या आणि माजी आमदार व सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी थेट सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर “गलिच्छ राजकारण” करत असल्याचा गंभीर आरोप केला. हा निर्णय पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा कुतिन्हो यांनी केला आहे. त्यांनी दवर्ली पंचायतीच्या विरोधी पक्षाच्या सदस्यांसह एकत्र येत या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलन केले आणि निवडणूक अधिकृतपणे स्थगित करण्याची मागणी लावून धरली.

नवीन तारखेची प्रतीक्षा

सदस्यांच्या तीव्र विरोधामुळे आणि तणावामुळे अखेर निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. दावर्ली पंचायतीतील तणावपूर्ण परिस्थिती शांत झाल्यानंतर आता लवकरच सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीसाठी नवीन तारीख जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com