Margao News : भर पावसात 47 घरे पाडणार? मडगावमधील दवर्ली पंचायतीने धाडल्या नोटिसा

काेमुनिदादच्‍या शेतीसाठी राखीव ठेवलेल्‍या जागेवर अतिक्रमण करून ही घरे बांधण्‍यात आल्‍याची तक्रार यापूर्वी नोंद करण्‍यात आली होती.
Davorlim
DavorlimDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव दवर्ली-दिकरपाल ग्रामपंचायतीने दवर्ली येथील भगवती कॉलनीतील सुमारे 47 बेकायदेशीर घरे पाडण्याच्या नोटिसा संबंधित घरमालकांना बजावल्या आहेत. त्‍यामुळे या घरांवर पुन्‍हा एकदा टांगती तलवार आहे.

यातील १७ जणांनी पंचायतीच्‍या या नोटिशीला पंचायत खात्‍याच्‍या उपसंचालकांच्‍या कार्यालयात आव्‍हान दिले असून या आव्‍हान अर्जावरील सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे.

काेमुनिदादच्‍या शेतीसाठी राखीव ठेवलेल्‍या जागेवर अतिक्रमण करून ही घरे बांधण्‍यात आल्‍याची तक्रार यापूर्वी नोंद करण्‍यात आली होती. त्‍यामुळे १५२ घरे संकटात आली होती. यापूर्वी पंचायतीने काही घरांना अशी नोटीस बजावली होती. आता नव्‍याने आणखी ४७ घरांना ही नोटीस बजावली आहे. घरमालकांनी ३० दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्‍यास ही घरे पाडण्‍यात येतील असे यापूर्वीच्या नोटिशीत म्‍हटले होते.

Davorlim
Monsoon Care: पावसाळ्यात इलेक्ट्रिक गाड्यांची घ्या खास काळजी; ‘या’ टिप्सची होईल मदत

ही 30 दिवसांची मुदत ३ जूनला संपली आहे. त्‍यामुळे या घरांवर आता टांगती तलवार आहे. यासंदर्भात दवर्ली-दिकरपालचे सरपंच व्‍हेर्कुलान नियासो यांना विचारले असता, यातील काही घरमालकांनी या नोटिशीला पंचायत उपसंचालकांकडे आव्‍हान दिले आहे, असे सांगितले.

Davorlim
Goa Weather Update: गोव्याला 'यलो अलर्ट'; पुढील पाच दिवस बरसणार मुसळधार

घरे पाडण्याचा ठराव

यापूर्वी ४ मे २०२३ रोजी पंचायतीने या घरांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ३१ मार्च २०२३ रोजी पंचायत मंडळाच्या सदस्यांच्या बैठकीसमोर हा विषय ठेवण्यात आला होता. या नोटिशीला दिलेले उत्तर असमाधानकारक असल्याचे या नोटिशीत म्हटले असून सर्व्हे क्र. ७/१ या भागात बांधलेली पक्‍की घरे बांधकामाचा कोणताही परवाना किंवा मंजूर आराखडा सादर करण्यात अपयशी ठरले आहेत. त्‍यामुळे ही घरे पाडण्याचे निर्देश देण्याचा सर्वानुमते ठराव घेण्‍यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com