Fatorda: ..मेगा गृहप्रकल्प नकोच! दवंडे येथील नागरिक आक्रमक; प्रकल्पाचे जाहिरात फलक हटवण्याची मागणी

Davande fatorda housing project: दवंडे, फातोर्डा येथील एका मेगा गृहप्रकल्पाविरोधात काही दिवसांपासून येथील नागरिक विरोध करीत आहेत. त्यांनी यापूर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
Davande fatorda mega housing project protest
Davande fatorda mega housing project protestDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: दवंडे, फातोर्डा येथील एका मेगा गृहप्रकल्पाविरोधात काही दिवसांपासून येथील नागरिक विरोध करीत आहेत. त्यांनी यापूर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी प्रकल्प जागेला भेट देऊन हा प्रकल्प लोकांना नको असेल तर उभा राहू देणार नाही, असे सांगितले होते.

Davande fatorda mega housing project protest
'सांत आंद्रे'तील भू-रूपांतरे स्थगित, आंदोलन मागे; सहाव्या दिवशी वीरेश बोरकरांच्या उपोषणाची सांगता

शुक्रवारी दवंडे येथील नागरिक अधिक आक्रमक झाले. त्यांनी नगरसेवक लिडंन परेरा व जॉनी क्रास्तो यांच्या समवेत पुन्हा एकदा मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांची भेट घेतली व त्या जागेभोवतालचे पत्र्याचे कुंपण तसेच प्रकल्पाचे जाहिरात फलक हटवण्याची मागणी केली.

Davande fatorda mega housing project protest
Goa News: वीज खांबांवर केबल्सचे 'बेकायदेशीर' जाळे; दोन कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल, वाचा दिवसभरातील घडामोडी

कारची मोडतोड प्रकरणी गुन्हा दाखल

नावेली मांडप येथे चाकूचा धाक दाखवून टॅक्सी चालकाला धमकाविल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अँथनी रिबेलो (२०,रा.चिंचणी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (ता.२५) वरील घटना घडली होती. याप्रकरणी रॉय मास्कारेन्स यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. संशयिताने दुचाकीने पाठलाग करत तक्रारदार चालवित असलेली कार रोखून चाकू दाखवून त्याला धमकावत कारचेही नुकसान केले होते. तक्रारदार चांदर येथून मोड्डी नावेलीच्या दिशेने येत असताना गुडी परिसरात संशयित अँथनी रिबेलो हा रस्त्याच्या मधोमध गाडी चालवत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com