Dattawadi Mapusa: दुचाकी अपघातात शिवोलीचा युवक ठार

जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Accident
AccidentDainik Gomantak

दत्तवाडी म्हापसा येथे दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने अॅक्टिव्हावरील दर्शन सीमेपुरुष्कर (50 घुबलावाडा ओशेल शिवोली ) हा युवक जागीच ठार झाला, तर दुसऱ्या मोटारसायकलवरील चालक जस्टीन जैन (केरळ ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Accident
Deviya Rane: आमदार होताच कामाचा धडाका; पर्येत दिव्या राणेंकडून विविध विकासकामांना हिरवा कंदील

सविस्तर वृत असे की, जस्टीन जैन हा आपल्या मोटारसायकलवरुन झेवियर कॉलेजकडून वेगाने येत होता. तसेच दर्शन सीमेपुरुष्कर म्हापसाहून झेवियर कॉलेजकडे जात होता. यावेळी स्मशानभूमीदरम्यान दोन्ही मोटारसायकलची जोरदार धडक झाली. यात दर्शन सीमेपुरुष्कर रक्तबंबाळ झाला. यावेळी रुग्णवाहिकेला अर्धातास उशीर झाला असल्याचे उपस्थितांनी माहिती दिली. त्यापूर्वी म्हापसा पालिकेचे नगरसेवक शशांक नार्वेकर घटनास्थळी पोहचले.

Accident
Curti-Khandepar ग्रामसभेत पार्कींग, बंधारा प्रश्नांवरुन धुमशान

नगरसेवक नार्वेकर यांनी आपल्या गाडीत दर्शनला घालून येथील जिल्हा इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी तो मरण पावल्याचे संगितले. तर जस्टीन जैन यांच्या तोंडाला, हाताला डोक्याला मार लागला आहे. त्याला जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच हवालदार तुळशीदास नारोजी यांनी घटनास्थळाच पंचनामा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com