Goa News: धोकादायक वृक्ष ताबडतोब तोडणे गरजेचे बनले आहे
Sanguem Dangerou Trees Dainik Gomantak

Sanguem Trees: वृक्ष की साक्षात यमदूत?

Goa News: धोकादायक वृक्ष ताबडतोब तोडणे गरजेचे बनले आहे
Published on

सांगे भागातील धोकादायक झाडे हीसुद्धा एक मोठी डोकेदुखी बनली आहे. गेल्या वर्षी चालत्या वाहनावर झाड कोसळून एक महिला जागीच ठार झाली होती. त्‍यानंतर धोकादायक वृक्षांची मोजमाप करण्यात आली आणि अवघी झाडे कापल्यानंतर वातावरण हळूहळू थंड होऊन गेले. प्रशासनही सुस्‍त राहिले.

यंदाचा पावसाळा सुरू होताच दुसरी दुर्घटना केवळ नशिबाने टळली. दांडो येथील जंक्शनवरील वृक्ष कोसळून ट्रक व चारचाकी वाहनांची मोडतोड झाली. सुदैवाने अनर्थ टळला. पुन्‍हा एकदा संबंधित यंत्रणेची धावपळ उडाली. वन खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी धोकादायक झाडांवर नंबर घातले. पण ही झाडे कधी तोडली जातील, हे काही स्‍पष्‍ट केलेले नाही. त्‍यामुळे धोका कायम आहे.

रिवण पंचायत क्षेत्रातील मसकावरे तिठ्यावर पूर्णपणे वाळलेले एक भलेमोठे झाड असून, ते कधीही कोसळून दुर्घटना घडू शकते. विशेष म्‍हणजे या सुकलेल्या झाडाखालीच विद्यार्थी, प्रवासी बससाठी ताटकळत उभे असतात. शिवाय या रस्त्यावरून सतत वाहतूक सुरू असते. त्‍यामुळे हा धोकादायक वृक्ष ताबडतोब तोडणे गरजेचे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com