प्रशासनाच्या बेफिकिरीचा बळी! दाबोळीत चालत्या दुचाकीवर कोसळलं भलेमोठं झाड; चालकाचा जागीच मृत्यू

Chikhali Kuththali Highway Tree Fall: वारंवार मागणी, विनंती करूनसुद्धा धोकादायक झाड न हटवल्‍याने चिखली-कुठ्ठाळी महामार्गावरील माटवे-दाबोळी येथे बुधवारी एकाचा बळी गेला.
Chikhali Kuththali Highway Tree Fall
Chikhali Kuththali Highway Tree FallDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वारंवार मागणी, विनंती करूनसुद्धा धोकादायक झाड न हटवल्‍याने चिखली-कुठ्ठाळी महामार्गावरील माटवे-दाबोळी येथे बुधवारी एकाचा बळी गेला. हे भलेमोठे झाड उन्मळून दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार फ्रान्सिस्को नुनीस (६२, रा. जेटी-सडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा दुचाकीस्‍वार नीलेश गावडे (३७) हा सुदैवाने बचावला. त्‍याला किरकोळ जखमा झाल्‍या.

मिळालेल्‍या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास माटवे-दाबोळी येथील सेंट अँथनी चॅपेलजवळ ही दुर्घटना घडली. कोसळलेल्‍या धोकादायक झाडासह तेथे आणखीही काही झाडे कोसळण्‍याची स्‍थितीत आहे. याबाबत राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार धोकादायक झाडे तोडण्‍याची मागणी करण्‍यात आली.

Chikhali Kuththali Highway Tree Fall
Goa Konkani Theatre: कोकणी स्पर्धात्मक रंगभूमीने टाकले सुवर्णमहोत्सवी पाऊल; 50 वर्षांचा सांस्कृतिक प्रवास

परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याने आजही दुर्घटना घडली, असा आरोप स्‍थानिकांनी केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे झाड अचानक उन्मळून रस्त्यावर पडले. त्याचवेळी दुचाकीवरून जात असलेले फ्रान्सिस्को झाडाखाली अडकले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्‍यान, माटवे-दाबोळी मार्गावर पडलेल्या झाडाशेजारी आणखी एक झाड धोकादायक अवस्थेत असल्याचा दावा चिखलीचे पंच रोमन वाझ यांनी केला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी त्यांनी केली.

डोंगर उभा कापल्‍याने झाडे पडण्‍याची भीती

या मार्गावरील रुस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्‍यावेळी डोंगर कापणी करण्यात आल्याने तेथील काही झाडे धोकादायक ठरली आहेत. तलाठी व वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांसमवेत धोकादायक झाडे शोधून अहवालही सादर करण्यात आला होता. पण राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. डोंगर उभा कापल्‍याने झाडे कधीही उन्मळून पडण्‍याची भीती आहे.

कार अपघातात एक ठार, एक जखमी

दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सेपरेटरच्या वळणावर झालेल्या अपघातात कारमधील रमेश चौधरी (राजस्‍थान) हा मरण पावला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व राजवीर सिंग (गुजरात) हे दोघे कारने मंगळवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास जात असताना हा अपघात घडला.

राजवीर कार चालवत होता. त्‍याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार ग्रेड सेपटरेटच्या कठड्यावर जोराने आदळली. या अपघात रमेश चौधरी गंभीर जखमी झाला. चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरू असताना त्‍याचा मृत्‍यू झाला. तर, राजवीर हा जखमी झाला आहे.

Chikhali Kuththali Highway Tree Fall
Goa Market Complex: डिचोलीतील बाजार संकुलाची होणार दुरुस्ती; आमदारांकडून संकुलाची पाहणी

पाऊणतास वाहतूक ठप्प : घटनेची माहिती मिळताच वास्को अग्निशमन दल, वाहतूक पोलिस आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊणतास ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने क्रेनच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या काळात दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पावसाचा जोर मंदावला : राज्यात मागील आठवडाभर सक्रिय असलेला मान्सून पुन्हा काहीसा मंदावला आहे. पुढील चार ते पाच दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. मागील २४ तासांत राज्यात सरासरी २२.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सून हंगामात आत्तापर्यंत राज्यात ८९५ मि.मी. म्‍हणजेच ३५.२६ इंच पाऊस पडला असून, सरासरीच्या तुलनेत अजूनही २४.७ टक्के तूट कायम आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी वाऱ्याचा जोय कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com