Amona News: धोकादायक वळणामुळे चालकांची तारांबळ! आमोणेत वारंवार अपघात; सूचना फलक बसवण्याची मागणी

Amona Accidents: आमोणेत धोकादायक वळणाची माहिती देणारा सूचनाफलकही नाही, त्यामुळे जंक्शकडून येणारे वाहन हे भरधाव असते, त्यामुळे वारंवार होणारे हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे.
Amona Accidents: आमोणेत धोकादायक वळणाची माहिती देणारा सूचनाफलकही नाही, त्यामुळे जंक्शकडून येणारे वाहन हे भरधाव असते, त्यामुळे वारंवार होणारे हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे.
Amona Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Frequent Accidents Reported on the Hazardous Curve Near Amone Junction

आमोणे: कोणीर येथील जंक्शनजवळ सुमारे दोनशे मीटरवर असलेल्या धोकादायक वळणावर आजवर अनेक अपघात झाले आहेत. बुधवारी दुपारी येथील एका खाण कंपनीतून वाहन घेऊन जाणारा ट्रेलर क्र. एम एच ४६ बी.एफ १५९८ हे वाहन या वळणावर मोटरसायकलला बाजू देताना रस्त्याबाहेर जाऊन शेतात कलंडले. यात ट्रेलरसह त्यात असलेल्या वाहनाचेही नुकसान झाले.

कोणीर येथील जंक्शन हे उतारणीवर असल्याने वाहने भरधाव सोडली जातात, त्यामुळे या जंक्शनपासून दोनशे मीटरवर उजव्या बाजून वळसा असलेल्या या वळणाचा वाहनचालकांना अंदाज येत नाही, त्यावेळी समोरून एखादे वाहन आल्यास त्या वाहनास बाजू देण्याच्या प्रयत्नात वरून येणारे वाहन रस्त्याबाहेर जाऊन शेतात विसावते.

विशेषत: अवजड वाहनांसाठी हे वळण धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत अनेक अवजड वाहने या ठिकाणी कलंडली आहेत. या धोकादायक वळणाचा अंदाज वरून येणाऱ्या अनोळखी चालकास येत नाही, वळण उजव्या बाजूने असल्याने वळणार पोचल्यावर चालकाची तारांबळ उडते.

Amona Accidents: आमोणेत धोकादायक वळणाची माहिती देणारा सूचनाफलकही नाही, त्यामुळे जंक्शकडून येणारे वाहन हे भरधाव असते, त्यामुळे वारंवार होणारे हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे.
CM Pramod Sawant: 'ती'चे पितळ मीच उघडे पाडले होते! 'नोकरी घोटाळा' प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

या वळणाची माहिती देणारा सूचनाफलकही या ठिकाणी नाही, त्यामुळे जंक्शकडून येणारे वाहन हे भरधाव असते, त्यामुळे वारंवार होणारे हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढवून उजव्या बाजूचे हे वळण कमी करणे आवश्‍यक आहे. मात्र तोवर तात्पुरती उपाययोजना म्हणून या ठिकाणी सूचना फलक लावणे तसेच वेगनियंत्रक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com