Damu Naik: 'मतभेद असले तरी मनभेद नको...'; प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच दामू नाईकांची पहिली प्रतिक्रिया

Damu Naik BJP State President: भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण, या गेल्या काही दिवसांत उत्कंठा वाढवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले.
Damu Naik: 'मतभेद असले तरी मनभेद भेद नको...';  प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच दामू नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Damu Naik BJP State PresidentDainik Gomantak
Published on
Updated on

Damu Naik Appointed New BJP State President Goa

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण, या गेल्या काही दिवसांत उत्कंठा वाढवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले. शनिवारी (18 जानेवारी) पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली. दामू नाईक भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बनले.

शनिवारी सकाळी 10 वाजता गोमंतक मराठा समाज सभागृहात होणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. शुक्रवारी (ता.17) भाजपच्या गाभा समितीची बैठक पक्षाच्या कार्यालयात सायंकाळी 5 वाजता बोलावण्यात आली होती. त्यानंतर उमेदवार कोण हे स्पष्ट होणार होते. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दामू नाईक यांनी उपस्थित नेत्यांसह, कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Damu Naik: 'मतभेद असले तरी मनभेद भेद नको...';  प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच दामू नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Goa BJP State President: भाजपतर्फे 'भंडारी कार्ड', दामू नाईकच होणार गोव्याचे प्रदेशाध्यक्ष

मतभेद असल्यास मनभेद न होण्याची काळजी घ्यावी लागेल: दामू नाईक

नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ घालून, त्यांना पक्षाचे कार्य करताना राष्ट्र उभारणीसाठी प्रवृत्त करण्याचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणाचे मतभेद असल्यास मनभेद न होण्याची काळजी घ्यावी लागेल, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले. नाईक पुढे म्हणाले की, प्रदेश भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्षच आहे. या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी काळात पक्षाचे संघटन आणखी​ वाढवू. तसेच, आगामी सर्वच निवडणुका जिंकू.

दामू नाईक आणि नरेंद्र सावईकर यांची नावे चर्चेत

भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दामू नाईक व माजी खासदार ॲड नरेंद्र सावईकर यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी दामू नाईक यांची निवड या पदावर वर्णी लागणार असे कयास लावले जाते होते. दामू यांना मात्र शुक्रवारपर्यंत त्याविषयी अधिकृतपणे कोणीही सांगितलेले नव्हते.

Damu Naik: 'मतभेद असले तरी मनभेद भेद नको...';  प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच दामू नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Goa BJP: श्रेष्‍ठींची पसंती एकनिष्‍ठ 'दामू नाईकांच्या' नावाला! 'दिल्ली'च्या घोषणेकडे सगळ्यांची नजर

पोदेर ते भाजप प्रदेशाध्यक्ष... दामू नाईक यांचा प्रेरक प्रवास

वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर संघ विचारांचे बाळकडू घेतलेले दामोदर नाईक आता भाजप प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. बालपण व तरुणपण संघर्षात जाऊनही ते जिद्दीने जीवनाला सामोरे गेले. पाव, दूध, वर्तमानपत्र वाटप करत, बस वाहकाची भूमिकाही त्यांनी काही काळ बजावली होती. भाजपच्या दक्षिण गोव्यातील (South Goa) आशा पल्लवीत झाल्या आहेत. फातोर्डा मतदारसंघातून त्यांनी लोकानुनयन वाढवत नेले आहे. मृदू आणि लाघवी स्वभाव ही त्यांची बलस्थाने राहिली आहेत. दामू हे दोन वेळा आमदारपदी निवडून आलेले असून वयाच्या सहाव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जाणारे आहेत. याशिवाय, ते भंडारी समाजाचे असल्याचा मुद्दाही भाजपने विचारात घेतल्याचे सांगण्यात येते.

असा आहे, दामू यांचा परिचय:

  • नाव: दामोदर (दामू) ग. नाईक

  • जन्मतारीख: 6 सप्टेंबर 1971

  • शिक्षण: बी.ए.

  • व्यवसाय: व्यापार (ट्रेडिंग)

Damu Naik: 'मतभेद असले तरी मनभेद भेद नको...';  प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच दामू नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Damodar Naik: बसचालक ते भाजप प्रदेशाध्यक्ष; कोण आहेत दामोदर नाईक?

राजकीय कार्य

  • 1994 पासून भाजप कार्यकर्ता म्हणून काम सुरू

  • 2000-2002: फातोर्डा भाजप मंडळाचे सरचिटणीस

  • 2002-2007: आमदार म्हणून निवड

  • विविध समित्यांत सक्रिय सदस्य:

  • सार्वजनिक उपक्रम समिती

  • अंदाज समिती

  • आरटीआय राज्य परिषद सदस्य

  • 2002-2005- निवडणूक याचिका समिती- अध्यक्ष, गोवा हस्तोद्योग ग्रामीण व लघुउद्योग विकास महामंडळ

  • 2006: भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य

  • 2007: विधानमंडळ प्रवक्ते (भाजप)

  • 2012 पासून भाजपचे गोवा प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते

Damu Naik: 'मतभेद असले तरी मनभेद भेद नको...';  प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच दामू नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Datta Naik Case: पुण्‍याला जाण्‍यास दत्ता नायक यांना न्‍यायालयाची परवानगी; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

सामाजिक व सांस्कृतिक योगदान

  • विविध संस्थांचे नेतृत्व व सदस्यत्व:

  • श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष

  • साई सेवा समिती, घोगळचे अध्यक्ष

  • गोमंत विद्या निकेतन, मडगावचे आजीवन सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com