Ponda News: वीजवाहिन्यांचे नुकसान, वाहतुकीला खोळंबा, मडकई-बांदोड्यात पडझडीने हानी

Goa Rain: वेलिंग येथे मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली
Goa Rain: वेलिंग येथे मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली
Madkai Bandora Rain DamageDainik Gomantak
Published on
Updated on

गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आज (मंगळवारी) संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी फोंड्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. पारंपई - मडकई येथे वटवृक्ष कोसळल्याने एका घरासह वीज खांब व वीजवाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

प्रियोळ, बांदोडा तसेच मडकई भागात तीन घरांवर झाडे कोसळल्याने या तीनही घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेलिंग येथे मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली.

फोंडा तालुक्यात अन्य ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला खोळंबा झाला, जोरदार वारे आणि पावसामुळे काही ठिकाणी वीज खांबांचेही नुकसान झाले आहे. झाडांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच स्थानिकांनी ही झाडे हटवल्याने मार्ग मोकळा झाला.

मडकई मतदारसंघातील पारंपई येथील प्रताप नाईक यांच्या जुन्या घरावर वटवृक्ष कोसळल्याने मोठे नुकसान झाले. यावेळी घरातील कुटुंबीय सुदैवाने बचावले. येथील एका शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले तसेच वीजपुरवठा खंडित झाला. मागाहून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

प्रियोळमधील गावठण - वेलिंग येथील कृष्णा नाईक यांच्या घराची भिंत कोसळल्याने कौले तसेच छपराचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे ही मातीची भिंत कोसळल्याने घराचे छप्परच नाहिसे झाले आहे.

Goa Rain: वेलिंग येथे मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली
Goa Rain Update: उंच लाटांचा धोका, 'अंजुणे'मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कारवारशी संपर्क तुटला

नागेशी बांदोड्यात झाड पडून घराची हानी

नागेशी - बांदोडा येथील रविंद्र नागेशकर यांच्या घरावर आंब्याचे भले मोठे झाड पडून मोठे नुकसान झाले. किमान दोन लाख रुपयांची हानी झाली असल्याचे स्थानिक पंचसदस्य सुखानंद कुर्पासकर यांनी सांगितले. घरावर झाड कोसळले तेव्हा घरात काही लोक होते, पण हे लोक सुदैवाने बालंबाल बचावले. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घरांवर पडलेली झाडे हटवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com