Goa Airport : विमाने वळविण्‍यासाठी दबावाचे राजकारण : अमित पाटकर

Goa Airport : दाबोळी विमानतळ बंद पाडण्याचा व्‍यापक कट उघड झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak

Goa Airport :

मडगाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहाला भेट दिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतच कतार एअरवेजने दाबोळी विमानतळावरून मोपा विमानतळावर आपली विमानसेवा हलविण्याची घोषणा केली.

त्‍यानंतर दोन दिवसांनी गोव्‍याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी ‘जीएमआर’ कंपनीने दिल्लीतील भाजप सरकारवर दबाव आणल्याचे वक्तव्य केले. या दोन्‍ही घटना पाहिल्‍यास दाबोळी विमानतळ बंद पाडण्याचा व्‍यापक कट उघड झाला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

१४ आणि १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कतार भेटीनंतर घडलेल्या घटनांक्रमातून भाजप सरकारचा श्रीमंतांचे समर्थन आणि गरीबांचा विरोध हा अजेंडा स्पष्टपणे दिसून येत आहे.

‘जीएमआर’च्या दबावाखाली येऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतार सरकारसमोर कतार एअरवेजला त्यांचे ऑपरेशन मोपा येथे हलवण्याची विनंती केली असावी असे माझे ठाम मत आहे, असे पाटकर म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या क्रोनी क्लबला खूष करण्यासाठी भाजप सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दाबोळी विमानतळावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या गोमंतकीयांच्या उपजीविकेची पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना चिंता नाही, असे पाटकर यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने कतार एअरवेजच्या व्यवहारावर आणि दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. या गंभीर मुद्द्यावर आता पंतप्रधान मोदी यांनीच खुलासा करणे गरजेचे आहे, अशी मागणी पाटकर यांनी केली.

Amit Patkar
Amit Patkar: ‘म्हादई’प्रकरणी गोवा काँग्रेसची भूमिका कायम

गोमंतकीयांनी भाजप सरकारच्या खोट्या आश्‍‍वासनांच्या मोहात पडू नये. गोव्यातील जमिनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या क्रोनी भांडवलादारांच्या घशात घालण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. त्‍यामुळे गोमंतकीयांनी भाजपला कायमचा धडा शिकवावा.

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com