Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

Dabolim Airport Ranking Decline: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी सेवा गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या तिमाहीत तब्बल १२ स्थानांची घसरण झाली आहे.
Dabolim Airport Ranking Decline
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी सेवा गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या तिमाहीत तब्बल १२ स्थानांची घसरण झाली आहे. २०२६ च्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत ६५व्या क्रमांकावर असलेला दाबोळी विमानतळ एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीत ७७व्या क्रमांकावर घसरला आहे.

विमानतळ सेवा गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या ‘एएसक्यू’ सर्वेक्षणानुसार, दाबोळी विमानतळाचा प्रवासी समाधानाचा गुणांकही कमी झाला आहे. पहिल्या तिमाहीत पाचपैकी ४.९४ गुण मिळाले होते. दुसऱ्या तिमाहीत हा गुणांक ४.८९ वर आला. त्यामुळे जागतिक क्रमवारीत घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

Dabolim Airport Ranking Decline
Goa Education: क्रमवारी वाढली, आता गुणवत्ता उंचावू दे! शिक्षणात गोव्याची पायाभूत कामगिरी भक्कम

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीतील देशातील १६ प्रमुख विमानतळांचा विचार केला असता, दाबोळी विमानतळ आठव्या क्रमांकावर आहे. या विमानतळाचा ४.८९ गुणांक भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सरासरी ४.८८ गुणांपेक्षा किंचित अधिक आहे.

...तरी कामगिरी चांगली!

जागतिक क्रमवारीत घसरण झाली असली तरी दाबोळी विमानतळाची कामगिरी अद्याप जागतिक सरासरीपेक्षा चांगली आहे. जागतिक सरासरी गुणांक ४.३८ असून, दाबोळीला ४.८९ गुण मिळाले आहेत. तसेच ४.६८ या निर्धारित उद्दिष्टापेक्षाही दाबोळीचा गुणांक अधिक आहे.

Dabolim Airport Ranking Decline
Goa Police: पोलिसांचा धाक हवा, भीती नको! मायणा-कुडतरीपासून-फोंड्यापर्यंतच्या घटनांनी 'खाकी'च्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com