चक्रीवादळामुळे गोव्यात 40 कोटींचे नुकसान 

Cyclone causes loss of Rs 40 crore in Goa
Cyclone causes loss of Rs 40 crore in Goa
Published on: 
Updated on: 

पणजी : तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone) मोठा तडाखा बसून गोव्यात सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यात येत्या 24 मे ला सकाळी 7 वा. राज्यस्तरीय कर्फ्यूची (Curfew) मुदत संपत आहे त्यापूर्वी शनिवारी कोरोनाच्या स्थितीसंदर्भात आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. (Cyclone causes loss of Rs 40 crore in Goa)

बार्देश तालुक्याला सर्वात मोठा फटका बसून सुमारे 135 घरांचे नुकसान झाले आहे. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत बार्देश तालुक्यातील वीजपुरवठा पूर्ववत होईल. यावेळी सावंत यांच्यासमवेत म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा (Joshua Dsouza) आणि उपजिल्हाधिकारी उपस्थित होते. या चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यासाठी अर्ज केला त्यांना त्वरित आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत देण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी उच्च अधिकाऱ्यांसमवेत आभासी (video conferencing) पद्धतीने परिषद घेतली आणि त्यांना आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची युद्धपातळीवर माहिती जमा करून अर्जदारांना निधी देण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्गवरील अडथळे व मोडतोड प्राधान्याने साफ केले जातील, तर रुग्णालये आणि औषध कंपन्यांना अखंडित वीज पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच खेड्यांमध्ये वीज पूर्ववत होईल. चक्रीवादळाच्या परिणामामुळे सुमारे ७०० विजेचे खांब व सुमारे 200 ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. चक्रीवादळामुळे राज्यात मोठे मोबाईल टॉवर्सही कोसळले असल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant supports Jit Arolkar in Mandrem
Goa Assembly elections 23 constituencies
Canacona Silent Protest
 Yuri Alemao Girish Chodankar