Cutbona Mobor Cholera Cases
सासष्टी: वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा (Cruz Silva) यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कसलाही आकस नाही किंवा द्वेष नाही. कुटबण जेटी ही त्यांच्या मतदारसंघात येते व या जेटीच्या स्वच्छता कामात सामील व्हायला त्याला कोणीही अडवलेले नाही, असे स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.
ते म्हणाले की, जेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जेटीवर गेले तेव्हा ते आमच्यासोबत होते. तिथेच दक्षिण गोवा जिल्हा कार्यलयातील बैठक निश्चित झाली होती. आपल्या शेजारी त्यांच्यासाठी खुर्चीही ठेवली होती. मात्र ते बैठकीला उशिरा आले.
त्यानंतर जेटीच्या पाहणी बद्दलचा अहवाल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता. जर त्यांना जेटी स्वच्छतेबद्दल एवढी तन्मयता होती तर त्यानी तिथे यायला हवे होते. आपल्याला वाटले त्यांना यात रस नाही त्यामुळे नंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नाही. ते अजूनही जेटी स्वच्छता कामात सामील होऊ शकतात, असे मंत्री सिक्वेरा म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी भेटीच्या वेळी कुटबण जेटी संदर्भात अनेक निर्देश दिले होते. व हे सर्व पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली होती. तेव्हा ठरवलेले होते ते काम पूर्णत्वाकडे गेले आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री सिक्वेरा यांनी पत्रकारांना दिली.
नवीन जेटीचे उदघाटन ३० सप्टेंबर पर्यंत केले जाण्याची शक्यता असलयाचे कुटबण बोट मालक संघटनेने सचिव पॅट्रिक डिसिल्वा यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र ही जेटी सुरु केली तरी आमच्यासाठी ती बिन कामाची आहे. तिथे आमची वाहने नेण्यासाठी रुंद रस्ता नाही. तेव्हा मासळी लोडिंग व अनलोडिंग करताना भयंकर त्रास होणार आहे,असेही ते म्हणाले.पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी जे काही ठरविण्यात आले होते ते ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. स्वच्छतेचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे डिसिल्वा म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.