Canacona: कर्मचाऱयांना पाणी प्यायला वेळ नाही, तासतासभर नागरिक रांगेत; काणकोण पोस्ट ऑफिसची व्यथा

Canacona Post Office: काणकोण येथील मुख्य टपाल कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वाढत्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. साध्या कामाकरता तासभर रांगेत ताटकळत उभे रहावे लागत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
Canacona Post Office
Canacona Post OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

Canacona Post Office Criticized for Poor Service Amidst Staff Crunch

आगोंद: काणकोण येथील मुख्य टपाल कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वाढत्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. साध्या कामाकरता तासभर रांगेत ताटकळत उभे रहावे लागत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते विशाल पागी व निवृत्त मुख्याध्यापक उल्हास पै भाटीकर यांनी केल्या आहेत.

तालुक्यातील ७ पंचायती व नगरपालिका क्षेत्रातील नागरिक तसेच येथे येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांची संख्या वाढत असून या टपाल कार्यालयातील २ कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आल्यानंतर नव्या कर्मचाऱ्यांची त्या जागी नवीन नेमणूक करण्यात आली नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

याठिकाणी रेल्वे तिकीट आरक्षण करण्यासाठी सोय आहे, मात्र कमी कर्मचारी व तांत्रिक गोष्टीमुळे तेही शक्य होत नाही. येथे असलेले डाक कर्मचारी तरीसुद्धा चांगले काम करत आहेत. त्यांना पाणी पिण्यासाठीही सवड मिळत नाही, तेही अखेर माणूसच आहेत, असे उल्हास पै भाटीकर पुढे म्हणाले.

Canacona Post Office
Goa Tourism: विदेशी पर्यटकांची गोव्‍याऐवजी श्रीलंकेला पसंती! वाढीव व्‍हिसा शुल्‍काचा परिणाम; रशियन पर्यटकांचे मात्र प्राधान्‍य

डाक मुख्य कार्यालयातून याठिकाणी गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, नागरिकांना सदर टपाल कार्यालयात पैसे जमा करणे, काढून घेणे, त्याचप्रमाणे अन्य महत्वाची कामे, सरकारच्या विविध भागातील नागरिक गर्दी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com