कुडतरी येथील जैवविविधता वारसा स्थळात समाविष्ट होणार

गोवा राज्य जैवविविधता मंडळ करणार जाहीर
Biodiversity
BiodiversityDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोवा राज्य जैवविविधता मंडळाने कुडतरी जैवविविधतेने सजलेली स्थळे आता वारसा स्थळ म्हणून घोषीत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लोकांना सुचना तसेच काही हरकती असतील तर त्यासाठी राज्य सरकारने 60 दिवसांचा अवधी दिला आहे. वारसा स्थळासाठी प्रस्तावित असलेले क्षेत्र हे 6 लाख 12 हजार चौरस इतके आहे. (curtorim will be a biodiversity heritage site)

कुडतरी येथी ज्या स्थळांचा जैवविविधता वारसा स्थळ म्हणुन नोंद होणार आहे, त्यात रालोय तळे, अंगडी तळे, सोनबे तळे, गुड तळे, माय तळे, कोलंब तळे, मायतोलोय शेत यांचा समावेश आहे. हा संबंधीत प्रस्ताव सरकारी गॅझेटमध्येही प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकदा का या स्थळांची जैवविविधता वारसा स्थळ म्हणून नोंद झाली की या स्थळांचे सौंदर्यीकरण व संवर्धनाचे काम सुरु केले जाईल. या ठिकाणी आधुनिक पद्धतीने शेतीचे तंत्र सुरु केले जाईल.

Biodiversity
इंधन शुल्क कपातीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्वागत

या स्थळांची जरी जैवविविधता वारसा स्थळ म्हणून नोंद झाली तरी सद्याचा मालकीहक्कात बद्दल होणार नाही. असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. मालकीहक्का संदर्भात स्टेटस को अवलंबिला जाईल. तसेच या स्थळांचे रक्षण व देखभाल करण्यासाठी खास समितीची नियुक्ती केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Biodiversity
बारावीनंतर शिक्षणाच्या संधी...

स्थानिक प्रजाती, अधिवास आणि परिसंस्था यांचे संवर्धन आवश्यक

गोव्यात स्थानिक प्रजाती, अधिवास आणि परिसंस्था या किनारपट्टीपासून भुभागापर्यंत संवेदनशील आहे. जर तुम्ही समुद्रापासून 80 मीटरचा अरुंद भाग सोडला तर, 12 ते 15 किमी रुंदीचा संपूर्ण सखल प्रदेश हा राज्याचा सर्वात विकसित भाग आहे, ज्यामध्ये सुमारे 80% लोकसंख्या आहे. या भागात दाट नागरीकरण आहे. गोवा राज्यातील जैवविविधता राज्यातील विकासाच्या प्रत्येक टक्केवारीनुसार ऱ्हास होत आहे. यासाठी सौंदर्याचे जतन करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com