Rice Crop : भात पिकाची आधारभूत किंमत वाढवा; कुडतरीतील शेतकऱ्यांची मागणी

Rice Crop : भात पिकाचे उत्पादन घेण्यासाठी प्रतिमीटर जागेला सहा रुपये खर्च येतो. सरकारतर्फे ४ रुपये अनुदान दिले जाते.
Rice Agriculture
Rice Agriculture Dainik Gomantak

Rice Crop :

सासष्टी, सरकारने भात पिकासाठीची आधारभूत किंमत २० रुपयांवरून २२ रुपये वाढवली होती; पण इतर खर्च पाहता हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे कुडतरी येथील शेतकऱ्यांनी भातासाठीची आधारभूत किंमत २५ ते २८ रुपयांपर्यंत करण्याची मागणी केली आहे.

कुडतरी येथील शेतकरी वालेंतीन बार्रेटो यांनी सांगितले की, कुडतरी गावात मोठ्या प्रमाणात भात पिकविले जाते. येथील मायणा-कुडतरी, रासई मिळून चार भागांमध्ये भात पिकविले जाते. भात पिकाचे उत्पादन घेण्यासाठी प्रतिमीटर जागेला सहा रुपये खर्च येतो. सरकारतर्फे ४ रुपये अनुदान दिले जाते.

उर्वरित दोन रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. शिवाय भात तयार झाल्यानंतर ते सुकविण्यास नेण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही. पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे मिळत नाही. पावसाळ्यात तर शेतांमध्ये बरेच दिवस पाणी साचून राहते. त्यामुळे भात पीक कुजते. यासंदर्भात वन खात्याने, तसेच कृषी खात्याने शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे, असे बार्रेटो यांनी सांगितले.

Rice Agriculture
Goa Cashew Rates: काजूला 175 रु. भाव ही काँग्रेसचीच मागणी : एल्टन डिकॉस्टा

सॅनफर्ड लुईस आणि वालेंतीन बार्रेटो यांनी स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, आमदार लॉरेन्स हे आम्हाला पीक उत्पादनासाठी सर्व प्रकारची मदत करतात.

ते आम्हाला ट्रॅक्टर, यंत्रसामग्री मोफत पुरवितात. त्यामुळेच आम्हाला शेती करण्यास स्फूर्ती मिळते. यंत्रसामग्रीमुळे भात लागवड करणे आम्हाला काही प्रमाणात परवडते, असेही बार्रेटो आणि लुईस यांनी सांगितले.

पक्ष्यांकडून पिकाची नासाडी

पश्र्चिमी भागातील ग्रे हेडेड सोफान नावाचा पक्षी येऊन सर्व भात पीक खातो. त्यामुळे आम्हाला प्रचंड नुकसान सोसावे लागते. सरकारने सध्याच्या २२ रुपयांवरून आधारभूत किंमत २५ रुपये करावी, अशी मागणी बार्रेटो यांनी केली आहे.

शेतकरी सॅनफर्ड लुईस यांनी भाताची आधारभूत किंमत २८ रुपयांपर्यंत करावी, असे सांगितले. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या किडी, पक्षी भात पिकाची नासाडी करतात. त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी लुईस यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com