Migrants Verification : ...म्हणून परप्रांतीयांची पोलिस पडताळणी व्हावी; कुर्टी-खांडेपार पंचायतीची मागणी

आपल्या गावकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत, कु़र्टी-खांडेपार ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या परप्रांतीय लोकांची पोलिस पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
Migrants Police Verification
Migrants Police VerificationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आपल्या गावकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत, कु़र्टी-खांडेपार ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या परप्रांतीय लोकांची पोलिस पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

फोंडा पोलिसांना बुधवारी सादर केलेल्या तीन वेगवेगळ्या पत्रांमध्ये, पंचायतीने पोलिसांना विनंती केली आहे की, भाड्याने खोलीत राहणाऱ्या सर्व स्थलांतरितांचे भाडेकरू पडताळणी जलद करावी.

Migrants Police Verification
Panjim Smart City: उद्ध्वस्त राजधानी 'खरी कुजबूज'

फोंड्यातील पंडितवाडा मशिदीजवळील रोजंदारी मजुरांची आणि हवेली येथील अंडरपासमधून चालणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांची ओळख kaकरण्यात यावी अशी मागणी या पत्रांद्वारे करण्यात आली आहे.

सरपंच नावेद तहसीलदार यांच्यासोबत उपसरपंच विल्मा परेरा, पंच सदस्य भिका केरकर, बाबू चारी, निळकंठ नाईक यांनी फोंडा पीआय विजयकुमार चोडणकर यांची भेट संबंधित विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून गुन्हेगार भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंडितवाडा येथील मशिदीजवळ हे सर्व मजूर जमा होत असल्याची तक्रारही पंचायतीने एका वेगळ्या पत्रात केली आहे. रस्त्यावरील फेरीवाले अवैध धंदे करत असल्याची तक्रारही पंचायतीमार्फत करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mercedes accident Goa
Goa Police Torture Case
Mallikarjun Kharge Vehicle Attack
Goa University NAD Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com