

पणजी: राज्यात कोरोना नियंत्रणासाठी सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र अनेक ठिकाणी संचारबंदीचे तसेच कोरोना नियमावलींचे सर्रास उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. पणजी बाजार, विशाल मॉल, बसस्थानकावरील फूल विक्रेते. फास्ट फुडचे गाडे यांच्याकडून संचारबंदी नियमांचे उल्लंघन सध्या होत असून पोलिस याप्रकरणी कारवाई न करता कार्यालयात बसून आराम करत आहेत. (The curfew is being violated in the Goa and the police are ignoring it)
21 जून रोजी संपलेली संचारबंदी पुढे 28 जूनपर्यंत वाढवताना बाजारातील दुकाने व मॉलमधील दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली होती. पणजी मार्केटमध्ये एकावेळी ५० ग्राहकांना आत सोडले जाते. मात्र ही क्रिया फक्त आतील भागात होते. बाहेरील भागातील दुकानावर ग्राहक सुरक्षीत अंतर न ठेवता गर्दी करत आहेत. पणजी पणजी बाजाराच्या बाहेर तर वाहनांची गर्दीच होते. पणजी येथील विशाल मॉलमध्ये वेगळी दुकाने नाहीत. एकच मॉल आहे. सकाळच्या सत्रात चालू असतो. त्यामुळे तेथे लोकांची गर्दी होत आहे. मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येणाऱ्या ग्रहाकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी तेथ कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.
पणजी बसस्थानकावरील फूल विक्रेते संध्याकाळी तीन नंतरही आपली दुकाने खुली ठेवत आहेत. नियमानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 3 वाजेपर्यंतच दुकाने खुली ठेवण्यास सूट आहे. मात्र येथील फुलविक्रेते संध्याकाळी उशिरापर्यंत फुले विकतात. पोलिस तिकडे फिरकत नसल्याने त्यांचे फावते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.