Cunculim
CunculimDainik Gomantak

Cunculim: सावधान! कुंकळ्ळीतील प्रदूषण आणखी वाढणार, 'फिश मिल'साठी घाट; बड्या राजकीय पुढाऱ्याची भागीदारी

Cunculim fish meal project: वाढत्या प्रदूषणामुळे आधीच त्रस्त झालेल्या कुंकळ्ळीवासीयांना एका नव्‍या संकटाचा सामना करावा लागू शकतो.
Published on

पणजी: वाढत्या प्रदूषणामुळे आधीच त्रस्त झालेल्या कुंकळ्ळीवासीयांना एका नव्‍या संकटाचा सामना करावा लागू शकतो. राज्य सरकारच्या आशीर्वादाने आणखी एक ‘फिश मिल’ प्रकल्प कुंकळ्ळीत उभा राहत आहे. हा प्रकल्प औद्योगिक वसाहतीच्या बाहेर एका खासगी जागेत उभारण्‍यासाठी हालचाली सुरू झाल्‍या आहेत.

यापूर्वीच कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्‍या डझनभर ‘फिश मिल’ प्रकल्पांमुळे स्थानिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. ‘प्रदूषण कमी करा, फिश मिल प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीतून जनतेला मुक्त करा’ असे सरकारकडे आर्जव करणाऱ्या कुंकळ्ळीवासीयांच्‍या माथी आणखी एक प्रदूषणकारी फिश मिल प्रकल्प मारून जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ व गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ करू पाहात आहे.

Cunculim
Goa Drug Case: 'स्‍विगी डिलिव्हरी बॉय' निघाला ड्रग्स तस्कर, सांकवाळमध्‍ये 22 हजाराच्या गांजासह एकाला अटक

‘कुंकळ्ळी औद्योगिक विकास महामंडळा’च्या बाहेर १९ हजार चौ. मी. खासगी भूखंडावर भव्य फिश मिल प्रकल्प उभा राहणार आहे. पेडा वार्का येथील ‘गोवन मरीन इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड’ने फिश मिल प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी मागितली असून गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने यासाठी ‘इन प्रिन्सिपल’ परवानगी दिली आहे.

हा प्रकल्प केपे तालुक्यात उभा राहणार होता. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्यावर फिश मिल प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीने कुंकळ्ळीत जागा बदलून प्रकल्पाला पुन्हा परवानगी मागितली होती, ती मान्य करण्यात आली आहे.

Cunculim
Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

मग मुख्‍यमंत्र्यांच्‍या आश्‍‍वासनाचे काय?

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सुमारे दहा फिश मिल प्रकल्प सुरू असून प्रदूषणकारी फिश मिल प्रकल्प बंद करावे व अशाप्रकारच्या प्रदूषण करणाऱ्या फिश मिल प्लांटना कुंकळळीत परवानगी देऊ नये, असा ठराव पालिकेने दोनवेळा संमत केला होता.

तत्कालीन आमदार राजन नाईक यांनीही अशाप्रकारच्या प्रदूषित प्रकल्पांना सरकारने मान्यता देऊ नये, अशी मागणी केली होती. विद्यमान आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही विधानसभेत यासंदर्भात आवाज उठविला होता.

कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणकारी फिश मिल प्रकल्पांना सरकार मान्यता देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com