औद्योगीक वसाहतीतील प्रदूषण समस्येवरुन कुंकळ्ळीवासीय आक्रमक; शनिवारी मेणबत्ती मोर्चा

मेणबत्ती मोर्चाच्या माध्यमातून समस्या सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न स्थानिक करणार आहेत.
Cuncolim Industrial Estate
Cuncolim Industrial EstateDainik Gomantak
Published on
Updated on

Cuncolim Industrial Estate Goa Pollution: कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीतील प्रदुषणाच्या समस्येवर शनिवारी (16 डिसेंबर) मेणबत्ती मोर्चा आयोजित केला आहे. संध्याकाळी 6.30 वाजता कुंकळ्ळी बसस्थानक येथे सुरूवात होऊन चिफटेन मेमोरीयल येथे मोर्चाची सांगता होणार आहे.

औद्योगीक वसाहती शेजारील खासगी जमिनीत एका कंपनीने शेड उभारले आहे. हाच मुद्दा धरुनव प्रदुषणाच्या विषयावरुन लोकांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करीत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मेणबत्ती मोर्चाच्या माध्यमातून समस्या सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न स्थानिक करणार आहेत.

कुंकळ्ळीतील 800 नागरिकांच्या सहीचे निवेदन मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, उद्योग मंत्री व विरोधी पक्षनेते यांना देण्यात आल्यानंतरच सरकारी यंत्रणांना जागी झाली असा दावा स्थानिकांनी केला असून, याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांचा निषेध केला.

युरी आलेमावांचे दावे फोल

गोवा प्रदूषण मंडळासाठी कुंकळ्ळीतील घातक कचरा हटविण्यासाठी सरकारकडून आपण ५ कोटी मंजूर करुन घेतल्याचा दावा स्थानिक आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी एक महिन्यापूर्वी केला होता. परंतू सदर निधी प्रत्यक्षात आपल्याकडे पोहोचलाच नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांशी आपण प्रत्यक्ष मागणी केल्यानेच कुंकळ्ळीत ग्लोबल इस्पात कंपनीने उभारलेली शेड जमिनदोस्त करण्याचा आदेश सरकारने काढल्याचा दावा युरी आलेमाव यांनी केला होता. परंतू, चोवीस तासाच्या आतच सदर आदेशास सरकारी प्राधिकरणाने स्थगिती दिल्याने युरी आलेमाव यांचा दुसरा दावाही फोल ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com