Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Police Attack Betul: कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचा अनुप कावरेकर हा पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला. पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक केली असून, ते झारखंड राज्यातील आहेत.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: बेपत्ता असलेल्या दोघा इसमांच्या शोधासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर खुल्या जागेत मद्यपान करणाऱ्या मद्यपींनी लाथा-बुक्क्यांसह दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना खणगिणी-बेतूल येथे शनिवारी (ता. १६) घडली.

त्‍यात कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचा अनुप कावरेकर हा पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला. पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक केली असून, ते झारखंड राज्यातील आहेत.

जेबियार डुंग डुंग (२१), सुरेश हरिया (२१), राहुल किसन (२३), अमित लोहरा (२५), संदीप तिरके (३०) आणि समीर तिरके (२१) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस शिपाई साईराज नाईक हे तक्रारदार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेतूल येथील ‘ओएनजीसी’चे दोघे कर्मचारी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्या दोघांच्या शोधासाठी साईराज नाईक आणि अनुप कावरेकर हे दोघे पोलिस शिपाई तपासासाठी गेले होते.

Crime News
Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

संशयितांवर बेकायदा जमाव करणे, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणणे आदी गुन्ह्याखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर वेळीप पुढील तपास करत आहेत.

Crime News
Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

खुल्या जागेत मद्यपान : जाब विचारल्याने हल्ला

हे दोघे पोलिस तपासासाठी खणगिणी - बेतूल येथे आले असता, सनसेट किनाऱ्यावर हे सर्व संशयित खुल्या जागी मद्य पीत बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकून उघड्यावर दारू पीत असल्याबद्दल जाब विचारला असता, संशयितांनी उलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. तसेच नि:शस्त्र पोलिसांवर हल्लाही चढविला. संशयितांनी जोरदार दगडफेक केली तसेच लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली. यात अनुप यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sikh Bus Driver Assaulted in Britain
Mokhard Sisters Death Case
Jerson Gomes Attack Latest News
GIM Hostel Knife Attack Latest News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com