Cuncolim NIT: 'जागा दिल्या पण, नोकऱ्या नाहीत'! कुंकळ्ळी ‘एनआयटी’वरती आपचा आरोप; पैसे मागितल्याची ऐकवली Audio Clip

Cuncolim nit jobs issue: कुंकळ्ळीत एनआयटी उभारण्यासाठी स्थानिकांनी आपली वडिलोपार्जित जमीन देऊनही कुंकळ्ळीतील स्थानिकांना या नामांकित शिक्षण संस्थेत नोकऱ्या मिळत नाहीत.
Goa Job Scams
Goa’s Unemployment & Foreign Job ScamsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कुंकळ्ळीत एनआयटी उभारण्यासाठी स्थानिकांनी आपली वडिलोपार्जित जमीन देऊनही कुंकळ्ळीतील स्थानिकांना या नामांकित शिक्षण संस्थेत नोकऱ्या मिळत नाहीत. सुरक्षारक्षक (सिक्युरीटी), स्वच्छता कर्मचारी या सारख्या नोकऱ्यांसाठी स्थानिकांना सुद्धा पैसे मोजावे लागत असल्याचे ‘आप’चे गोवा राज्य संयुक्त सचिव प्रशांत नाईक आणि युवा नेते नेश कुतिन्हो यांनी उघडकीस आणले आहे.

याप्रकरणी सखोल चौकशी करावी तसेच स्थानिकांना एनआयटी संस्थेत चांगल्या नोकऱ्या द्याव्यात, अशी मागणी ही या दोघांनी केली. या आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एक ऑडिओ क्लिप जोडली आहे. त्यात नोकरी देण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे स्पष्टपणे म्हणताना ऐकू येत आहे.

‘एनआयटी’ साठी भूसंपादन करताना जमीन दिलेले तसेच स्थानिकांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले जाईल. माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. मनोहर पर्रीकर यांनीही तसा शब्द कुंकळ्ळीवासीयांना दिला होता. प्रत्यक्षात कुंकळ्ळीवासीयांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या नाहीतच वरून सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी व अन्य तत्सम नोकऱ्यांसाठी ही १० ते २० हजार रुपये किंवा एक पगार मागितला जात असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Goa Job Scams
Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

‘एनआयटी’त असलेले गोव्याबाहेरील याठिकाणी प्रमुख म्हणून वावरतात व ते स्थानिकांकडून ही सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यासाठी पैसे मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंकळ्ळीवासीयांनी ‘एनआयटी’साठी जमीन देऊन ही काहीच फायदा झाला नाही. असे नमूद करीत याला कोण जबाबदार असा प्रश्‍नही नाईक यांनी उपस्थित केला.

Goa Job Scams
Job Scam: "रेस्टॉरंटला रेटिंग द्या आणि कमवा 5 ते 8 हजार", MPच्या तरूणाने गोव्यात बसून केला स्कॅम! मुंबईच्या व्यक्तीकडून लुटले 6 लाख

‘आप’चे युवा नेते नेश कुतिन्हो म्हणाले की, एनआयटीत प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या बाहेरील व्यक्तींनी कुंकळ्ळीतील बेरोजगार युवकांची थट्टा चालवली आहे. रक्षक, स्वच्छता कर्मचारी म्हणून नियुक्तीसाठी पैसे मागितले जात असल्याचे पुरावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com