Mardol Mobile Tower: म्हार्दोळच्‍या क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरचे काम तूर्त बंद, स्थानिकांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

goa government: कुंकळ्ये - म्हार्दोळ येथील क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरला ग्रामस्थांसह स्थानिक क्रीडा क्लबने घेतलेल्या आक्षेपाची सरकारने गंभीर दखल घेतली आहेे.
Mardol Mobile Tower
Mardol Mobile TowerDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुंकळ्ये - म्हार्दोळ येथील क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरला ग्रामस्थांसह स्थानिक क्रीडा क्लबने घेतलेल्या आक्षेपाची सरकारने गंभीर दखल घेतली आहेे. तसेच टॉवर उभारण्यात येत असलेल्या जागेची उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

मात्र, जागा तपासणीवेळी नियोजित टॉवर मैदानाच्या परिघात येत असल्याचे सिद्ध झाल्याने, तसेच मोबाईल कंपनीने खोदकाम सुरू केलेली जागा नियमात नसल्याने फोंड्याचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी संंबंधित कंपनीला टॉवर उभारणीचे काम प्रलंबित ठेवण्याची सूचना केली.

या मैदानाचे पुन्हा भू-सर्वेक्षण करून डोंगर भागात टॉवरसाठी सरकारी जागा उपलब्ध होऊ शकेल काय, याची पडताळणी करण्याची सूचना क्रीडा खात्याच्या प्रतिनिधींना केली.

Mardol Mobile Tower
Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

म्हार्दोळ भागात क्रीडा मैदानावर मोबाईल टॉवर उभारण्यात येत असल्याने ग्रामस्थांतर्फे १३ तारखेला याविरोधात तक्रारवजा निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले होते.

काल झालेल्या या पाहणीवेळी मामलेदार, गटविकास अधिकारी, म्हार्दोळ पोलिस स्थानक निरीक्षक, शिक्षण खात्याचे निरीक्षक, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीचे सचिव, क्रीडा खात्याचे अधिकारी, टॉवर कंपनीचे प्रतिनिधी, स्थानिक क्रीडा क्लबचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Mardol Mobile Tower
Goa News : मुसळधार पावसानं उडवली दाणादाण, सत्तरीत गावकरांच्या घराचे छत पडले; आमदार देविया राणेंचा मदतीचा हात

लोकवस्तीत टॉवर नको : पंचायतीत ठराव

गेल्या महिन्यात अचानक मैदानावर टॉवरचे काम सुरू झाल्याचे लक्षात येताच सरकार-दरबारी निवेदन सादर करून या टॉवरला विरोध नोंदविला होता. या विरोधाला स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.

तसेच हल्लीच झालेल्या पंचायत ग्रामसभेत शाळा, जुनी मंदिरे व लोकवस्ती यांच्या अगदी जवळ टॉवर उभारणीस मंजुरी देऊ नये, असा ठराव मंजूर करून ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com