Cuncolim IDC: ‘कुंकळ्ळी औद्योगिक’मधील प्रदूषण समस्या त्वरित सोडवा; आरोग्य खात्याच्या उपसंचालकांचा निर्देश

Cuncolim IDC Pollution: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीच्या परिसरात प्रदूषणामुळे श्वसनासह व आरोग्याच्या इतर समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत असल्याने समस्या त्वरित सोडविण्याचे निर्देश उपसंचालक डॉ. रुपा नाईक यांनी बाळ्ळी आरोग्य केंद्राला दिले.
Industrial Pollution
Industrial PollutionCanva
Published on
Updated on

Cuncolim IDC Pollution

मडगाव: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीच्या परिसरात प्रदूषणामुळे श्वसनासह व आरोग्याच्या इतर समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत असल्याने, आमदार युरी आलेमाव यांनी उपस्थित केलेली समस्या त्वरित सोडविण्याचे निर्देश आरोग्य खात्याच्या उपसंचालक डॉ. रुपा नाईक यांनी बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नुकतेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. आलेमाव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, पोलाद आणि फिश मील उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणामुळे औद्योगिक वसाहतीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

येथे टाकण्यात येणाऱ्या धोकादायक कचऱ्याबरोबरच विशेषत: मत्स्यप्रक्रिया कारखाने, पोलाद निर्मिती कारखान्यांमुळे पाणी व वायू प्रदूषणाचे वाढते प्रमाण, याची तातडीने व सखोल चौकशी करण्याची गरज आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे मत्स्य प्रक्रिया कारखाने प्रक्रिया न केलेले पाणी स्थानिक जलस्रोतांमध्ये सोडत आहेत, परिणामी गंभीर प्रदूषण होत आहे.

Industrial Pollution
Goa Crime: फरार 'प्रिया यादव' अखेर पोलिसांच्या जाळ्यात! नोकरीच्या आमिषाने घातला होता कोटींचा गंडा

भूजल मूल्यांकनात नायट्रेट्स आणि फॉस्फरस सारख्या घटकांचे प्रमाण वाढण्याबरोबरच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) यांचे प्रमाण चिंताजनक रित्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. युट्रोफिकेशनमुळे ही परिस्थिती बिकट होते. ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली जाते. त्यामुळे हे जल धोकादायक आहे, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com