Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: धार्मिक भावना दुखावल्‍याने भाविक संतप्‍त; दोघींना अटक

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जमिनीवरील घरावर कब्जा करून नमिता फातर्पेकर तेथे रहात आहे.
Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin
Derogatory Comment on Shantadurga KunkalikarinDainik Gomantak

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin

कुंकळ्ळी, संपूर्ण गोमंतकीयांचे आराध्य दैवत असलेल्या फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान व महाजनांसंदर्भात समाज माध्यमांत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्याचा दावा करत, रविवारी दुपारनंतर असंख्‍य भाविक संतप्‍त बनले.

त्‍यांनी कुंकळ्ळी पोलिस ठाण्‍यावर मोर्चा वळवला. तद्नंतर कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित श्रेया धारगळकर व नमिता फातर्पेकर यांना अटक केली. कारवाईनंतर त्यांनी भविकांची जाहीर माफीही मागितली.

दरम्यान, या प्रकरणातील तिसरा संशयित अभिषेक नाईक यालाही त्वरित अटक करण्याची हमी पोलिसांनी दिल्यानंतर संतप्त झालेले नागरिक शांत झाले. दरम्यान, मंत्री सुभाष फळदेसाई, बाबू कवळेकर व संतोष फळदेसाई यांनीही पोलिस स्थानकाला भेट देऊन या प्रकरणावर चर्चा केली. श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीन संस्थानच्या जमिनीवर केलेली सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे संस्थान समितीचे अध्यक्ष कावेंद्र देसाई यांनी

सांगितले.

महिलांचा भर पावसात महामार्गावर ठिय्या

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानाबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून देवस्थानची बदनामी केल्याप्रकरणी गावातील नागरिकांसह महिलाही आक्रमक झाल्या होत्या. संध्याकाळी पाच ते साडेसातपर्यंत अडीच तास महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीची कोंडी झाली. सुमारे हजारभर भाविक व महिलांनी पावसाची तमा न बाळगता श्रेया व नमिता यांना अटक करावी या मागणीसाठी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

कुंकळ्ळीत मोठा पोलिस फौजफाटा

श्रेया यांनी समाज माध्यमावर टाकलेला व्हिडिओ मागे घ्यावा. माफीचा व्हिडिओ व्हायरल करावा व भाविकांची जाहीर माफी मागावी या तीन मागण्यांसाठी स्थानिक आग्रही होते. संतप्त जमाव काबूत येत नाही हे पाहून कुडचडे, केपे, कोलवा व मडगाव पोलिस स्थानकातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. उपअधीक्षक व चार पोलिस निरीक्षक यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह कुंकळ्ळीत तैनात होते.

व्यापारी संघटनेकडून निषेध

कुंकळ्ळी व्यापारी संघटनेने कुंकळळीकरीण संस्थानची बदनामी केल्याप्रकरणी श्रेया धारगळकर व इतर दोघांचा तीव्र निषेध करून त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी बाजारपेठ बंद ठेवली होती.

नेमके काय झाले?

१ फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जमिनीवरील घरावर कब्जा करून नमिता फातर्पेकर तेथे रहात आहे. त्या प्रकरणी नमिता हिने बेकायदेशीर बांधकाम करून संस्थान समितीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार संस्थान समितीने केली होती.

२ त्या रागाने नमिता हिने श्रेया धारगळकर हिला हाताशी धरून संस्थानची बदनामी करणारा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर अपलोड केला होता.

३ या संदर्भात संतप्त महाजनांनी तातडीची बैठक घेऊन रविवारी सकाळी पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन संध्याकाळी चार वाजेपर्यंत धारगळकर हिच्यासह तिघा संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin
Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

४ पोलिसांनी श्रेया धारगळकर व इतर दोघांना अटक करावी व त्यांना जनतेच्या हवाली करावे या मागणीसाठी भाविकांनी अडीच तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. तसेच पोलिस स्थानकावर तीन तास ठिय्या आंदोलन केले.

५अखेर श्रेया धारगळकर व नमिता फातर्पेकर यांनी संस्थानची व महाजनांची जाहीर माफी मागितल्यानंतर स्थानिक माघारी फिरले. पोलिसांनी श्रेया व नमिता यांना रीतसर अटक केली.

‘आपण जे केले ते अनवधानाने’ :

आपण जे काही केले ते अनवधानाने झाले. त्यामुळे भाविकांच्या आणि महाजनांच्या भावना दुखावल्याबद्दल आपण सर्वांची जाहीर माफी मागते व समाज माध्यमांवर टाकलेले व्हिडिओ मागे घेते. तसेच समाज माध्यमावर माफीचा व्हिडिओ व्हायरल करते, असे सांगून श्रेया धारगळकर हिने जाहीर माफी मागितली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com