NEET Exam : फर्मागुढीत नव्‍हे, कुंकळ्‍ळीत होणार उद्या ‘नीट’ परीक्षा! ओमप्रकाश जयस्वाल

NEET Exam : विद्यार्थ्यांनी नोंद घेण्‍याचे आवाहन, फोंड्यातील केंद्रे कायम
NEET Exam Centre
NEET Exam CentreDainik Gomatnak

NEET Exam :

पणजी, रविवार ५ मे रोजी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेसाठी फोंड्यात केवळ चार उपकेंद्रे असून फक्त फर्मागुढी ‘एनआयटी’ केंद्रात होणारी परीक्षा कुंकळ्ळी येथे ‘एनआयटी’ नव्या कॅम्पसमध्ये होणार आहेत.

नॅशनल टेस्‍टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येणारी ‘नीट’ परीक्षा रविवार ५ मे रोजी राज्यातील विविध उपकेंद्रांवर होणार आहे. यापैकी ‘एनआयटी’ गोवा हे देखील एक केंद्र आहे. परंतु चार महिन्यांपूर्वीच फर्मागुढी-फोंडा येथून या ‘एनआयटी’चे कुंकळ्ळी येथे स्थलांतर करण्‍यात आले आहे.

यामुळे केंद्रातील ‘नीट’ परीक्षा एनआयटी गोवाच्या कुंकळ्‍ळी येथील नवीन वास्तूत होणार आहे व याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन एनआयटी गोवाचे संचालक ओमप्रकाश जयस्वाल यांनी केले.

फोंड्यात चार उपकेंद्रे

१. पी.ई.एस. कॉलेज आॅफ फर्मासी

२. जी. व्ही. एम. उच्च माध्यमिक विद्यालय

३. अमेय उच्च माध्यमिक विद्यालय

४. केंद्रीय विद्यालय कुर्टी, फोंडा

एनआयटी फर्मागुडी केंद्रात नीट परीक्षा देणारे विद्यार्थी आता एनआयटी कुंकळ्ळी कॅम्पसमध्ये परीक्षेला बसतील.

NEET Exam Centre
Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

प्रवेशपत्रावरील पत्त्‍यावरून संभ्रम नको

एनआयटी गोवा परीक्षा केंद्रात ३६० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यातील बहुतांश विद्यार्थी हे गोमंतकीय आहेत. परंतु शेजारील राज्यांतील काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो यासाठी जनजागृती व्हावी म्‍हणून माध्यमांद्वारे ही सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेसाठी जे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) देण्यात आले आहे, त्यात कुंकळ्ळीचा पत्ता देण्यात आला आहे. परंतु त्या पत्त्‍यावर फोंड्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन विद्यार्थी फोंड्याला जाऊ शकतात. तसे न करता विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कुंकळ्‍ळी येथे यावे, असे आवाहन जयस्वाल यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com