मद्यपी पर्यटकांमुळे नदी किनारी  पडलेल्या बाटल्या अन्‌ कचरा
मद्यपी पर्यटकांमुळे नदी किनारी पडलेल्या बाटल्या अन्‌ कचराDainik Gomantak

वाळवंटी नदीत आंघोळीसाठी युवकांची गर्दी

उकाड्यातून मिळतो दिलासा: मद्यपी पर्यटकांचा अतिउत्साह धोक्याचा!
Published on

पर्ये: उकाडा असह्य होत असल्याने केरी, मोर्ले भागातून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी राज्याच्या विविध भागांतील तरुणांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते. गटागटाने येणारे यातील बरेच तरुण दारूच्या नशेत नदी डोहात आंघोळ करताना दिसतात. असे दारूच्या नशेत नदी डोहात पोहणाऱ्यांना जीवघेणे होऊ शकते.

काही पोहायला न येणारेही पाण्यात डुबकी मारत असतात. वाळवंटीचे बरेच डोह खोल असून त्यात बुडण्याची भीतीही असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दूधसागर नदी पात्रात एक युवक बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना वाळवंटी नदीत असे प्रकार होऊ शकतात, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष वेधून असे प्रकार रोखावेत, अशी मागणी होत आहे.

मद्यपी पर्यटकांमुळे नदी किनारी  पडलेल्या बाटल्या अन्‌ कचरा
'उगवेतील अवैध रेती उपसा थांबवा'

वाळवंटी नदीचे गोड्या पाण्याचे पात्रात चांगले आणि स्वच्छ असल्याने स्थानिक युवक व गोव्याच्या विविध भागांतील तरुणांची गर्दी असते. शनिवार , रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी इथले नदी पात्र गजबजून गेलेली पाहायला मिळतात.

केरीतील कळस कोण, हडडीचो कणो, उभो गुणो, पेळावदो, वेलची कोण, चिंचमळा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आंघोळीसाठी येत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com