Bicholim News : डिचोलीत शालेय साहित्य खरेदीला गर्दी; नववीची पाठ्यपुस्तके अनुपलब्ध

Bicholim News : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर डिचोलीचा बाजार शालेय साहित्याने फुलला आहे. यंदा आकर्षक रेनकोट आणि छत्र्यांसह शालेय साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पूर्वसंध्येला आज (सोमवारी) डिचोलीत शालेय साहित्य खरेदीला जोर आला होता. दुसऱ्या बाजूने बाजारात पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली असली, तरी इयत्ता नववीची मराठी आणि गणित या दोन विषयांची पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध झाली नसल्याने विद्यार्थ्यांची सध्या तरी गैरसोय झाली आहे. उद्यापासून (मंगळवारी) शाळांना सुरुवात होत आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर डिचोलीचा बाजार शालेय साहित्याने फुलला आहे. यंदा आकर्षक रेनकोट आणि छत्र्यांसह शालेय साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात शालेय साहित्याची खरेदी सुरू झाली असली, तरी मागील दोन दिवसांपासून खरेदीला जोर आल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाही रेनकोट छत्र्यांसह शालेय साहित्याच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून येत आहे.

शहरातील बागायतदार बाजार या स्वयंसेवी दालनासह शिरोडकर, वेन्सन, आमोणकर आदी ठराविक दुकाने शालेय साहित्याने सजली आहेत. या दुकानांतून वह्या तसेच अन्य शालेय साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. काही दुकानांमधून रंगीबिरेंगी आणि विविध डिझाईनच्या छत्र्या, रेनकोट, बॅग्स आकर्षण ठरत आहेत.

Bicholim
Goa Loksabha Election 2024 Result: दुपारपर्यंत ठरणार गोव्याचे खासदार, दोघांनाही दोन्ही जागांबाबत विश्वास

कार्टूनचे प्रिंट असलेले रेनकोट आणि बॅग्स तर लहान मुलांना आकर्षित करीत आहेत. बॅग्स, छत्र्या, रेनकोट या वस्तूंमागे किमान १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य पालकांच्या कपाळावर आट्या पडत आहेत. शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात येणारी मुले तर आपल्या आवडीच्या वस्तूंसाठी हट्ट करताना दिसून येत आहेत. मुलांच्या हट्टापायी पालकांनाही खिशाला कातर लावावी लागत आहे.

डिचोलीच्या बाजारात इयत्ता नववी ते त्यापुढील इयत्तांची पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत. पाठ्यपुस्तकांची खरेदीही सुरु झाली आहे. तरीदेखील इयत्ता नववीची गणित आणि मराठी या विषयाची पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध झाली नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण झाली आहे. ही पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या बाजारात शालेय साहित्य खरेदीला प्रतिसाद मिळत आहे.

- प्रकाश शिरोडकर, दुकानदार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com