पराभूत उमेदवारांनी निर्वाचन अधिकारी प्रताप गावकर यांना धरले धारेवर

त्यामुळे येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: अवेडे पंचायत प्रभाग ४ मध्ये प्रत्यक्ष मतदानावेळी २७५ मतदान झाले होते; पण मतमोजणी वेळी २९९ मतांची मोजणी झाल्याने पराभूत उमेदवारांनी निर्वाचन अधिकारी प्रताप गावकर यांना धारेवर धरले. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

(crisis between election candidates and Electoral Officer Pratap Gawkar)

Goa Panchayat Election
Goa Panchayat: तिसवाडी तालुक्यात प्रस्थापितांना धक्के

वेडे पंचायत प्रभाग चार मध्ये एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले होते. मतदानादिवशी या प्रभागासाठी एकूण २७५ मतदान झाले होते. पण आज मतमोजणीदिवशी हा आकडा २९९ पर्यंत गेल्याने पराभूत उमेदवारांनी हे कसे होऊ शकते, प्रश्न निर्वाचन अधिकाऱ्यांना केला. याविषयी केपेचे निर्वाचन अधिकारी प्रताप गावकर यांना विचारले असता, मतमोजणीच्या नमुन्यात छापील चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी उमेदवारांनी हा प्रश्न उपस्थित केल्याने आम्ही मतमोजणीवेळी जे दस्तऐवज तयार करतात, ते तपासून पाहिले असता २७५ मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. मतमोजणी होऊन एक तासाने ज्या उमेदवारांनी हा प्रश्न उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com