Goa Crime : गोव्यात ज्येष्ठ नागरिक असुरक्षित; गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्याने चिंता

एनसीआरबी अहवालातून धक्कादायक बाब समोर; गोव्यात सर्वाधिक नोंद
Senior Citizens in Goa
Senior Citizens in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime : राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक ती पावले उचलण्यात येत असली तरी फौजदारी प्रकरणे वाढली आहेत. 2002 साली 31 प्रकरणांची नोंद झाली होती, ती संख्‍या 2021 मध्ये 50 वर गेली आहे. हे प्रमाण सुमारे 61 टक्के आहे. या सर्व प्रकरणांमध्ये कोणालाही अजून शिक्षा झालेली नाही तर चार प्रकरणांत न्यायालयाने निर्दोषत्व ठरवले आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोतर्फे (एनसीआरबी) जाहीर झालेल्या माहितीनुसार राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. 2021 मध्ये नोंद झालेल्या 50 प्रकरणांमध्ये फातोर्डा येथील मिंगेल मिरांडा व त्याची सासू कॅटरिना पिंटो यांचा समावेश आहे. या दोघा ज्येष्ठ नागरिकांचा 2021 खून झाला होता. ज्येष्ठ नागरिकांचा खून, चोरी, फसवणूक व अपहरण, घुसखोरी या प्रकरणांचीही त्यापूर्वीच्या वर्षात वाढ झाली होती. या प्रकरणांमध्ये कोणालाही शिक्षा झाली नसल्याने ही चिंतेची बाब आहे. गोव्यातील हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत देशात सर्वाधिक आहे. तसेच राज्यात विविध न्यायालयांत प्रलंबित असलेली प्रकरणेही सर्वाधिक आहेत. हे प्रमाण 97.8 टक्के आहे. 2021 मध्ये एकाही प्रकरणात न्यायालयाने शिक्षा दिलेली नाही तर 2002 मधील 4 प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात आरोपींना निर्दोष ठरवले आहे. न्यायालयाने चार प्रकरणे जी निकालात काढली आहेत, त्यात संशयितांचा सुगावा लागलेला नाही किंवा आवश्‍यक पुरावा मिळालेला नाही अशीही प्रकरणे आहेत.

Senior Citizens in Goa
CM Pramod Sawant : गोव्यातील ड्रग्‍जविक्री, गुन्हेगारी मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍नशील

तब्‍बल 182 प्रकरणे प्रलंबित

ज्येष्ठ नागरिकांसंबंधी आतापर्यंत 182 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी 30 प्रकरणे 2021 मधील आहेत. जे ज्येष्ठ नागरिक घरात कुटुंबाव्यतिरिक्त राहत आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक विशिष्ट पद्धत अवलंबिण्यात आली आहे असा दावा पोलिस करत आहेत. विविध पोलिस स्‍थानकांनी आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती नोंदवून ठेवलेली असते. ‘बीट’ पोलिस ज्येष्ठ नागरिकांच्‍या घरी जाऊन त्यांची चौकशी करण्‍याची ही पद्धत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com