मडगाव : गोव्यात गांजा विकणाऱ्यांनी सुळसुळाट माजविलेला असताना क्राईम ब्रँचने काल रात्री मडगाव आणि वेर्णा या दोन ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन उत्तर प्रदेशमधील संशययितांना अटक करण्यात आली. तर त्यांच्याकडून 8.58 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. (Crime Branch seizes Rs 8 lakh cannabis in Madgaon and Verna)
यातील पहिली कारवाई काल रात्री मडगाव स्टेशन रोडवर घालण्यात आली. पोलीस (Police) निरीक्षक फिलॉमेना कॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँचने धाड घालत राहुल मिश्रा (वय 23) याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 4.80 किलो गांजा मिळाला. ज्याची किंमत 4.80 लाख रुपये किंमत होती.
हा संशयित मडगावमधील (Margao) एका लॉजमध्ये उतरला होता. स्टेशन रोडवर तो गांजा विकण्यास येणार याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक मार्लन डिसोझा आणि पोलीस शिपाई विक्रम खानोलकर, सैमुल्ला मकांदर व अजय नाईक यांचा समावेश होता.
दुसरी धाड रात्री उशिरा वेर्णा (Verna) पंचायती जवळ निरीक्षक फिलॉमेना कॉस्ता व थेरान डिसोझा यांनी टाकत मनीष सेठ (वय 26) या उत्तर प्रदेश येथील युवकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 3.78 लाख रुपयांचा (3.78 किलो) गांजा पकडला. या धाडीत गिरीश पालडोसकर, विनायक सावंत, कल्पेश तोरसकर व साईनाथ नाईक या शिपायांनी भाग घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.