वास्को: यौनावस्थेत क्रिकेट जगतात नावारुपास आलेल्या दाबोळीतील वीर कमलाप्रसाद यादव याने वयाच्या 12 व्या वर्षापासून क्रिकेटचे धडे घेण्यास सुरुवात केली. गोवा क्रिकेट संघाच्या 14, 16 आणि 19 वर्षांखालील स्पर्धेत वीर यादव उत्तम फलंदाज म्हणून नावारूपास येत आहे. (Dabolim Cricket Latest News)
विशेष म्हणजे त्याची बहिण हर्षिता देखील क्रिकेटचे (Cricket) प्रशिक्षण घेत आहे. गेल्या अडीच वर्षापासून वीर बंगळुरू येथील जस्ट क्रिकेट अकादमी मध्ये क्रिकेटचे पुढचे धडे घेत आहे. भावा बहिणीची ही जोडी क्रिकेटमधील उगवते तारे ठरणार आहेत. 17 वर्षीय वीर यादव हा डावखुरा फलंदाज असून मागील वर्षात त्याने गोवा (Goa) क्रिकेट संघातून खेळताना उत्तम फलंदाजी केली आहे.
12 वर्षाचा असताना वीर याने सागचे प्रशिक्षक अजय चव्हाण यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली. भविष्यात गोवा क्रिकेट संघ आणि गोवा कॉर्पोरेट लीग खेळताना वीर याने उत्तम अशी कामगिरी बजावली. 14 वर्षांखालील गोवा क्रिकेट संघात खेळताना त्याने केरळ (Kerala) विरुद्ध उत्तमरित्या फलंदाजी करत 99 धावा करून आपल्या संघाला त्या सामन्यात मोठे पाठबळ दिले होते. गेल्या अडीच वर्षांपासून वीर बंगळुरू येथे जस्ट क्रिकेट अकादमीमध्ये धडे घेत आहे. वीर याची छोटी बहीण हर्षिता यादव ही 13 वर्षाची असून एक वर्षापासून ती सुद्धा त्याच क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे शिकत आहे. वीर आणि हर्षिता यादव यांचे वडील कमलाप्रसाद यादव चिखली ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून क्रिकेट जगतात आपले भविष्य बनवण्यासाठी त्यांचा दोन्ही मुलांना पूर्ण पाठिंबा देत आहे. वीर आणि हर्षिताची आई सुनीता यादव त्यांच्या देखभालीसाठी सध्या बंगळुरू येथे त्यांच्याबरोबर राहते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.