Pernem News : क्रॅश फायर टेंडरचालक दिशा नाईकचे अभिनंदन

Pernem News : यावेळी ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले की, विमानतळावर लागलेली आग विझविण्यासाठी ‘क्रॅश फायर टेंडर’ हे अत्यंत शक्तिशाली वाहन वापरले जाते.
Pernem CRASH FIRE TENDERS Driver Disha Naik
Pernem CRASH FIRE TENDERS Driver Disha Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

Pernem News : पेडणे, मनोहर आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळावर ‘क्रॅश फायर टेंडर’ चालवणारी कासारवर्णे येथील दिशा नाईक ही देशातील पहिली भारतीय अग्निशामक महिला अधिकारी ठरली आहे.

याबद्दल छोटेखानी कार्यक्रमात गोवा राज्य कॉंग्रेसचे सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर, पेडणे मतदारसंघाचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक, तसेच समाज कार्यकर्ते भास्कर नारूलकर, उदय महाले यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.

यावेळी तिचे वडील गोविंद नाईक, आई निकिता नाईक आणि नातेवाईक उपस्थित होते. यावेळी ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले की, विमानतळावर लागलेली आग विझविण्यासाठी ‘क्रॅश फायर टेंडर’ हे अत्यंत शक्तिशाली वाहन वापरले जाते.

Pernem CRASH FIRE TENDERS Driver Disha Naik
Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या इंधनाचे ताजे भाव

हे वाहन चालवण्याचे काम आतापर्यंत केवळ पुरुष करत आले आहेत. मात्र, कासारवर्णे येथील धाडसी दिशा नाईक हिने पुरुषांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढली आहे. तिने आपल्या गावासह गोव्यालाही नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. यावेळी कृष्णा नाईक, भास्कर नारुलकर यांनीही तिचेकौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com