Crane Collapsed in Chorla Ghat
Crane Collapsed in Chorla GhatDainik Gomantak

कंटेनर काढताना चोर्ला घाटात क्रेन उलटली

चोर्ला घाटात वाहतुकीची कोंडी : डांबरीकरणानंतर अपघातांत वाढ
Published on

पर्ये : चोर्ला घाटात आज पहाटे मालवाहू कंटेनर रस्त्याकडेला कलंडून अपघात झाला. तो उलटलेला कंटेनर काढण्यासाठी सकाळी क्रेन आणली. त्या क्रेनच्या साहाय्याने कंटेनर काढण्याच्या प्रयत्नात क्रेनही रस्त्यावर उलटली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. आणखी एक क्रेन आणून कंटेनर व क्रेन काढण्यात आली.

घाटात पहाटे उलटलेला कंटेनर काढेपर्यंत दुपारचे 2 वाजले. त्यामुळे या वेळेत घाटातून एका बाजूने वाहतूक सुरू होती. वाळपई पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून क्रेन काढण्याच्या कामात मदत करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कंटेनरचालकाला किरकोळ जखम झाली. क्रेन चालकालाही इजा झाली नाही.

चोर्ला घाटात वारंवार अपघात होत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. आठ दिवसांपूर्वी या मार्गाचे पुन्हा डांबरीकरण केले होते. पूर्वी हा रस्ता खड्डेमय होता. त्यावेळी वाहतुकीला मर्यादा येत होती. चालक वाहने सावकाश हाकत होते. पण आता रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहने बेफाम वेगाने चालवली जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील धोका वाढला आहे. पोलिस यंत्रणेने हा धोकादायक बनत चाललेला घाट मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Crane Collapsed in Chorla Ghat
झुआरी पुलाच्या डागडुजीचे काम सरकारने त्वरित करावे

आठ दिवसांत दुसरा अपघात

चोर्ला घाट ते साखळी शहरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहने वेगाने हाकली जात आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. सहा दिवसांपूर्वी पर्येत भाजीपाला वाहतूक करणारा टेम्पो दरीत कोसळला होता. रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. या अपघात वाहनचालक जखमी झाला होता. आज पहाटे पुन्हा कंटेनर उलटला.

घाटात रहदारी वाढली

घाट मार्गाचे डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावरील अवजड वाहतूक वाढली आहे. त्यातच सध्या सुटीचा हंगाम असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून गोव्यात खासगी वाहने घेऊन येणारे पर्यटक याच मार्गाचा अवलंब करत आहेत. वाहनांची संख्या वाढल्याने या मार्गावर ताण येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com