Illegal Construction: सरकारी जमीनीवरील 35 बेकायदेशीर घरे 'जमीनदोस्त'; कुचेलीत प्रशासनाची धडक कारवाई!

Illegal Construction in Cunchelim-Mapusa: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी जमीनीवर उभारण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचा पालिकांकडून धडाका लावण्यात आला आहे.
Illegal Construction: सरकारी जमीनीवरील बेकायदेशीर 35 घरे 'जमीनदोस्त'; कुचेलीत प्रशासनाची धडक कारवाई!
Illegal Construction in Cunchelim-MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी जमीनीवर उभारण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचा प्रशासनाने धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वी, नार्वेवाडा, कळंगुटमधील बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेली बांधकामे पालिकेने पोलीस बंदोबस्तात पाडली. यातच आता, कुचेली येथेही प्रशासनाकडून अशीच कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेली 35 घरे पाडली.

दरम्यान, सरकारी जमीनीवर बांधण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्याची प्रक्रिया राज्य प्रशासनाने सुरु केली आहे. कुचेली-म्हापसा येथे सरकारी जमीनीवर बेकायदेशीर कब्जा करुन मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आली होती. वारंवार प्रशासनाकडून सांगूनही लोक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले. तत्पूर्वी, प्रशासनाने बेकायदेशीर बांधकामाविरोधात नोटीस जारी केली होती मात्र या नोटीसकडेही डोळेझाक करण्यात आली. त्यामुळे आज (12 नोव्हेंबर) प्रशासनाकडून या बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली.

Illegal Construction: सरकारी जमीनीवरील बेकायदेशीर 35 घरे 'जमीनदोस्त'; कुचेलीत प्रशासनाची धडक कारवाई!
Goa Illegal Constructions: वाढत्या बेकायदा बांधकामांस अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत; आज हायकोर्टात होणार फैसला!

दुसरीकडे, खोब्रावाडा-कळंगुट येथे भाटकाराच्या जमिनीत बेकायदा उभारलेल्या तीन पक्क्या खोल्या बुधवारी दुपारी पंचायत मंडळाने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या. यावेळी बार्देश तालुक्याचे मामलेदार, गटविकास अधिकारी तसेच स्थानिक पंचायत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Illegal Activities At Goa Tourist Places
Temwada Beach Demolition
Temwada Morjim CRZ Violations
Illegal Call Center
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com